Home > मॅक्स वूमन > लोकप्रियतेच्या लाटेवर पंकजा मुंडे..

लोकप्रियतेच्या लाटेवर पंकजा मुंडे..

राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या भाषणाचा एका तरूणाच्या मनावर इतका परिणाम झाला की त्याने हुंडा प्रथेच्या विरोधात आपलं आयुष्य झोकून देण्याचा निर्णय घेतला, इतकंच नव्हे तर स्वत: देखील हुंडा न घेता लग्न केलं. वरवर ही बातमी फार छोटी वाटेल काही लोकांना, मात्र याचं गांभीर्य खासकरून मराठवाडा आणि आत्महत्याग्रस्त विभागातील लोकांना जरूर पटायला लागलंय. राज्यात आजही अनेक भागांमध्ये जीवघेणी हुंडाप्रथा सुरू आहे. या प्रथेच्या विरोधात अनेकांनी काम करण्याचा प्रयत्न केला मात्र ग्रामीण भागात त्याला फारसं यश मिळताना दिसत नाही. हुंड्याला स्त्रीधन किंवा इतर अनेक गोंडस नावं देऊन ही प्रथा सुरू आहे, मुलाची नोकरी-जमीन यांच्या प्रमाणात हुंड्याचा रेट ठरलेला असतो. या प्रथेच्या विरोधात पंकजा मुंडे जनजागृती करत आहेत. त्यांचं भाषण ऐकून रवी चाटे या युवकाने हुंडाविरोधी चळवळ सुरू केलीय. तसंच स्वत: ही हुंडा न घेता लग्न करून आदर्श घालून दिला आहे.

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पार्थिवाला अग्नी देण्याच्या मुद्द्यापासून हुंडाविरोधी चळवळीत मोलाची भूमिका बजावण्यापर्यंत पंकजा मुंडे या सतत खंबीर आणि पुरोगामी भूमिका घेत आल्या आहेत. त्याचमुळे राज्यभरात त्यांची लोकप्रियता गोपीनाथ मुंडे यांच्यासारखीच वाढायला लागलीय.

Updated : 17 July 2018 2:01 PM GMT
Next Story
Share it
Top