Home > मॅक्स वूमन > 'श्रीदेवीचे सौंदर्यच ठरलं तिच्या मृत्युचे कारण'

'श्रीदेवीचे सौंदर्यच ठरलं तिच्या मृत्युचे कारण'

श्रीदेवीचे सौंदर्यच ठरलं तिच्या मृत्युचे कारण
X

५४ हे जाण्याच वय नाही आणि ज्या पद्धतीने तिने स्वत:च वय गोठवलं होतं, ज्या प्रकारे ती cute, sweet, drop dead georgeous दिसायची त्यावरून तर तिचं असं cardiac arrest ने जाण अशक्य वाटतं. अश्विनी एकबोटे पुण्यात तिच्या प्रयोगा दरम्यान हृदयविकाराचा झटका येवून रंगमंचावरच कोसळली होती. तिच वय फक्त ४४ होतं. Telugu Industry मध्ये famous असणाऱ्या आरती अगरवाल ने २०१५ ला ३१ व्या वर्षी exit घेतली. शरीरातील फॅट कृत्रिमरीत्या काढून वजन कमी करण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या लायापोसक्शन सर्जरीने तिचा बळी घेतला. सर्जरी केल्यानंतर तिला श्वास घेण्यात अडथळे येत होते त्यामुळे admit असताना ऑपरेशन केल्याच्या ६ व्या आठवड्यात असाच cardiac arrest चा झटका येवून ती गेली.

श्री चे जुने फोटो पाहिले तर सावळा चेहरा, बसकं नाक, जाड ओठ, कुरळे केस अशा द्राविडीयन सौंदर्याचा ती उत्तम नमुना होती दक्षिणेत तिच्या दिसण्याबद्दल लोकांना काही आक्षेप नव्हता पण हिंदी मध्ये आल्यावर तिला बदलाव लागलं. अभिनया पेक्षा हिंदी फिल्म इंडस्ट्री मध्ये सौंदर्याचे मापदंड महत्वाचे ठरलेले असतात. त्या मापदंडात बसण्यासाठी शरीरावर आणि चेहऱ्यावर सुऱ्या फिरवून घेवून तिला त्या मापदंडामध्ये स्वत:ला बसवावं लागलं. तशी ती बसली आणि तिने lady superstar म्हणून बॉलिवूड गाजवलं सुद्धा. प्रचंड पैसा, प्रचंड प्रसिद्धी, awards, rewards, अमाप लोकप्रियता त्याच्यानंतर वादग्रस्त लग्न करून मुलींच्या जन्मानंतर घेतलेला चित्रपट संन्यास इतके टप्पे पार करून आयुष्यात हवे असलेले बहुतांशी सगळे milestone मिळवल्यानंतर सुद्धा तिला second inning खेळाविशी वाटली. तिने ती खेळून आजही आपण बॉलीवुडच्या शिखरावर असलेल्या कुठल्याही अभिनेत्रीला काट्याची टक्कर देवू शकतो हे दाखवून ही दिल पण हे करताना आजच्या पिढीबरोबर राहण्याची धडपड, पुन्हा एकदा त्याच प्लास्टिक सर्जरींचा चक्रव्यूह, चेहऱ्यावर एकही सुरकुती दिसू नये म्हणून दर वेळी केलं जाणारं विखारी प्रोसिजर असा संपूर्ण चेहऱ्याचा,संपूर्ण शरीराचा कायापालट पन्नाशी ओलांडलेल्या,थकलेल्या शरीराला झेपत होता का?

मागे एकदा घरी गेले असताना नेहेमीप्रमाणे आई च्या हातून रिमोट हिसकावून घेवून सगळे channel फिरवत असताना एका ठिकाणी श्री दिसली होती तिच्या MOM या चित्रपटाबद्दल बोलताना. गाल, जबडा ,नाक, ओठ, डोळे या ठिकाणी केलेल्या सर्जिकल करेक्शनमुळे तिला बोलताना, ओठांची उघडझाप करतानाही त्रास होत होता हे दिसून येत होतं. आज जरी इन्स्टावर तिचा ३ दिवसापूर्वीचा फोटो पाहिला तरी ती एकदम सामान्य, फिट, चांगल्या शारीरिक मानसिक अवस्थेमध्ये असणाऱ्या व्यक्ती सारखीच दिसते पण खरच असं होतं का?

वयाच्या ५४ व्या वर्षी ही ३० व्या वर्षा सारखी दिसण्याची धडपड, अतोनात प्रमाणात केलेल्या प्लास्टिक सर्जरी, त्या सर्जरींचे इतर दुष्परिणाम टाळण्यासाठी ज्या ठिकाणी सर्जरी झाल्या त्या अमेरिकेतल्या दक्षिण कॅलिफोर्नियाच्या सततच्या वाऱ्या, वजन कमीत कमी ठेवण्यासाठी केले जाणारे आणि काही लोकांनी सर्टिफाइड केलेले useless fad diets, शरीरातले नैसर्गिक harmones बंद झाल्यामुळे कृत्रिमरीत्या steroidical drugs टाकून त्याच्या आधारावर उभी केलेली फिरणारी स्लिम, ट्रीम अशी जिवंत डेडबॉडी बनली होती ती! हेच तिच अकाली जाण्याचं पडद्यामागचं सत्य आहे. श्री मेली नाही ती बळी गेली. सेकंड इनिंग पूर्ण ताकदीने मैदानात उतरून खेळण्याच्या तिच्या इच्छेने, तिच्या इमेज चा फायदा करून पैसा कमावण्याच्या तिच्या नवऱ्याच्या सुप्त इर्षेने, बॉलिवूडमध्ये सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या स्लिम, फिट, सेक्सी झिरो फिगर च्या demanding culture ने तिचा खून केला.

बाईने कायम सुंदर, सुबक दिसावं. घराण्याचा वंश चालवण्यासाठी मुलांना जन्म दिल्यानंतर आणि ती मुलं वाढवताना सुद्धा हसतमुख, सुडौल बाहुलीसारखं स्वत:ला maintain ठेवावं. बाईच्या वाढत्या वयाबरोबर तिचं वजन वाढणं, तिचे केस गळणं, तिचा चेहरा खराब होणं हा तिचा अक्षम्य अपराध आहे सबब बाई सुंदर दिसत असेल तरच तिच्या जगण्याला अर्थ आहे असले नाजायज विचार ठेवणाऱ्या पितृसत्ताक समाजाला श्री ने घेतलेली अकाली exit ही सप्रेम भेट ठरावी.

Updated : 26 Feb 2018 7:15 AM GMT
Next Story
Share it
Top