Home > मॅक्स वूमन > 'हि माझी धमकी आहे तुला'

'हि माझी धमकी आहे तुला'

हि माझी धमकी आहे तुला
X

१० वर्षा पूर्वी जे घडलय ते आज मी तुमच्या समोर मांडणार आहे. दुसरी हि मुलगीच झाली म्हणून नवऱ्याचे पिणे आणखी वाढले होते परंतु मी हार मानायाला तयार नव्हते लग्नाला ६ वर्ष झाले होते साडे चौदा वर्षाची असतांना माझे लग्न झाले होते. जे खेळायचं बागडायचं वय असं त्या वयात संसाराचा गाडा माझ्या खांद्यावर मला ओढवा लागत होता. नवरा पितोय हे लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच समजले होते परंतु आई बापाला त्रास नको म्हणून सर्व त्रास मी सहन करत गेले त्याला सुदरवण्याचा प्रत्न करत राहिले परंतु सुख माझ्या नशिबात नव्हतेच आणि दुःख देवाला मागुन घेतले होते मी... असच म्हणायला हरकत नाही.

लग्नाला ६ वर्ष झाली होती परंतु नवऱ्याने मात्र कधी पगार हातात दिला नव्हता, त्याला प्यायलाच त्याचा पगार पुरत नव्हता उलट लोकांकडून घेतलेल पैसे मला द्यावे लागायचे मी टेलरिंग काम करायची आणि त्यातच माझा उदरनिर्वाह करायची रूमचे भाडे किराणा मुलींचा खर्च आणि नवऱ्याने करून ठेवलेली उधारी हे सर्व मलाच बघावं लागायच, त्यातच माझी छोटी मुलगी अपंग होती. आता, तर तिचाही खर्च वाढला होता तिला दर महिन्याला संचेती हास्पिटलमध्ये न्यावे लागायचे काय करू काहीच सुचत नव्हते. माझा टेलरींगचा व्यवसायात जेम तेम घर खर्च आणि किराणा भागायचा माझ्या लेकीला तिच्या पायावर मला उभं करायच होत परंतु त्यासाठी आणखी जास्त काम करायची गरज मला होती मी आता शिवण क्लासही घेत होते परंतु एकच मशीन असल्याने जास्त बायका येत नसत. आणखी 2 3 मशिनी असतील तर मला खूप मदत होईल परंतु मशिनीसाठी पैसे नव्हते एका महिलेने सांगितले तुम्हाला एक व्यक्ती मदत करू शकतो. त्यांना सांगा ते तुम्हाला बँकेतून कर्ज मिळवू देतील मला त्या व्यक्तीचा नंबर त्या महिलेने दिला आणि मी त्यांना फोन केला मला कर्ज हवय... मला तुंम्ही मदत केली तर माझ्यावर खूप उपकार होतील त्या व्यक्तीने मला लगेच होकार दिला. तुम्हाला आमचे नेते मदत करतील मी तुम्हाला त्याच्याकडे नेतो तुम्हाला यावं लागेल. त्यांच्या ऑफिसला मी एक क्षणाचाही विचार ना करता लगेच हो म्हणाले... दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीने मला नेत्याच्या ऑफिसला घेऊन गेले. मी त्यांच्या पुढे माझी व्यथा सांगितली आणि त्यांना सांगितले माझ्याकडे माझ्या इमानदारी व्यतिरिक्त काहीही नाही ३० हजार रुपया पर्यंत कर्ज मिळाले तर खूप उपकार होतील तुमचे त्यांनी एक पतसंस्थेवाल्याला फोन केला. मला 30 हजार द्यायला सांगितलं त्यांनी मला 8 दिवसात कर्ज मंजूर करून दिले. मला खूप आनंद झाला होता माझ्या स्वतःच्या हिंमतीवर काहीतरी करून दाखवले. याचा मला खूप आभिमान वाटतोय मी त्या देव माणसाचे उपकार कसे फेडू काही ओळख नसतांना यांनी मला इतकी मोठी मदत केली होती.

मी जराही उशीर न लावता त्या पैशात ४ मशीन घेऊन आले आता माझ्याकडे महिलाही शिवणक्लाससाठी वाढल्या होत्या. 15 दिवसाने मला ज्या व्यक्तीने नेत्याकडे नेले होते, त्या व्यक्तीचा फोन आला तुम्हाला जे कर्ज दिलय त्याच्या अजून काही प्रोसेस बाकी आहे. तुम्हाला त्यांनी बोलावले पाहिल्यांदाच कर्ज घेतले हो मला यातली काहीहि माहिती नव्हती. मी त्यांना कुठे यावे लागेल असे विचारले त्यांनी सांगितले त्यांच्या ऑफिसला या उद्या 10 वाजता... मी दुसऱ्या दिवशी 10 वाजता ऑफिसला गेले माझ्याबरोबर आणखीही बरीच माणसं त्यांना भेटायला आली होती, त्या सर्वांना आत पाठवले जात होते. मला मात्र बसवून ठेवले. माझ्या मागून आलेल्या लोकांना आत पाठवत होते. मी सारखी रिसेप्शनला बसलेल्या मुलाला विचारायचे मला सोडा ना आत... माझं 3 महिन्याचं बाळ घरी आहे. परंतु तोही काहीच बोलत नव्हता आणि आतही सोडत नव्हता. 2 वाजले माणसांची गर्दी संपली आणि त्याने आत सोडले. आत ते पुढारी साहेब बसलेले होते हॉलमध्ये आमच्या दोघाच्या व्यतिरिक्त कुणीही नव्हते. माझ्या मनात अनेक प्रश्नांनी वादळं निर्माण केलं होत मला काहीही सुचत नव्हते. अपराध्यासारखी त्यांच्या समोर जाऊन बसलेय आणि विचारले साहेब कुठे सह्या करायच्या सांगा... माझं बाळ घरी आहे, मी 10 वाजेपासून बसलेय खूप रडत असेल ती फक्त तीन महिान्याची आहे.

साहेब काहीच बोलत नव्हते परंतु माझ्याकडे मात्र खूप घानरड्या नजरेने बघत होते. मी त्यांना ववणी करत होते. कुठे सह्या करायच्या सांगा मला काहीच सुचत नव्हते तेवड्यात पुढारी साहेब बोलले जी प्रोसेस बाकी आहे ती पूर्ण करण्यासाठी तुला त्या मागच्या रूममध्ये 2 तास द्यावे लागतील तुला जमेल का...

माझ्यापायाखालची जमीन सरकली होती मी त्यांना विनवणी करत होते, मी तुमच्या मुलीसारखी आहे माझ्यावर दया करा. मी अस काहिही करू शकत नाही.

पुढारी साहेब रागात कडाडले तू काय अप्सरा समजतीस काय स्वतःला? मला नाही बोलण्याची तुझी हिम्मत कशी झाली.. माझ्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते परंतु त्यांना माझी दया येत नव्हती.

4 दिवसांचा वेळ देतोय. तुला मला फोन करून सांग नाही तर पैसे परत आणून दे...

खूप खचून गेले होते काहीही सुचत नव्हते... रस्त्याने चालत होते परंतु कुठं चाललेय माझे मलाच कळत नव्हते काय करू कुठून आनुन देऊ पैसे काहीही कळत नव्हते. हे काय करून बसलेय मी कुणाची मदत घेतलीय. देवाशी भांडत होते तू आहेस ना रे मग कुठेस तू का मला या दरीत ढकललेस कुठेही चित्त लागत नव्हते. काय करू कुणाकडे जाऊ कुणाला मदत मागू आता तर मदत मागायची सुद्धा भीती वाटत होती. 4 था दिवस उगवला आणि पुढारी साहेबांचा माणूस घरी आला तुम्हाला साहेबांनी बोलवले. असं वाटत होते मुलींना घेऊन एखाद्या विहीरीत उडी मारावी. कुणाला सांगू आणि माझे ऐकणार तरी कोण? आई वडिलांनाही मदत माघू शकत नव्हते त्यांच्या गरिबिला आग लागलेली ते मला कुठून मदत करतील काहीही सुचत नव्हते. 6-7 दिवसांनी पुढारीसाहेबांचा फोन आला काय विचार केलास येती कि पैसे आणून देते. मी विनवणी करत होते परंतु त्या दैत्याला जराही दया येत नव्हती.

दररोज त्याचे फोन यायचे नाही तर त्याची माणसं यायची कधी उचलून न्यायच्या धमक्या द्यायची तर कधी गलिच्छ भाषेत शिवीगाळ करायची काही समजत नव्हते.

त्या वेळेला मला कायद्याची जराही माहिती नव्हती नवऱ्याचा दररोज मार खायची परंतु कधी पोलिसात त्याची तक्रारसुद्धा केली नव्हती. माझा खूप छळ केला त्या नराधमाने परंतु त्याची शिकार मी झाले नाही शेवटी तो हरला आनि मी जिकंले. हे सांगण्याच्या मागचे तात्पर्य इतकेच कि हे प्रत्येक महिलांच्या आयुष्यात घडत असत परंतु आपण गप्प बसतो म्हणून हि प्रवृत्ती निर्माण होती त्या नराधमाच्या त्रास अजुनही मला आहे परंतु तो समोर येऊन मला नडत नाही कुणाच्यातरी खांद्यावून बंदूक ठेऊन माझ्यावर गोळ्या झाडतोय त्याला एकाच निरोप आहे माझा मला चण्डिकेचा अवतार घ्यायला भाग पाडू नको. वय झालाय नीट रहा नाहीतर तुझं नाव घेऊन बोलायला सुद्धा कमी करणार नाही. हि ती संगीता नाहीये...

याला धमकी समज नाहीतर चेतावणी समज...

माझ्यावर असे खोटे गुन्हे दाखल करून तू काहीही सिद्ध करू शकत नाही तुझ्यात दम असेल तर समोर येऊन नड मग सांगतेय तुला...

Updated : 7 March 2018 8:16 PM GMT
Next Story
Share it
Top