Home > मॅक्स वूमन > फिफात महिला नेतृत्वाचा साक्षात्कार करणा-या कोलिंडा

फिफात महिला नेतृत्वाचा साक्षात्कार करणा-या कोलिंडा

फिफात महिला नेतृत्वाचा साक्षात्कार करणा-या कोलिंडा
X

फिफाचा अंतिम सोहळा पार पाडला मात्र या सोहळ्या दरम्यान जगाला महिला नेतृत्वाचा साक्षात्कार क्रोयेशियाच्या राष्ट्राध्यक्ष कोलिंडा यांनी दिला आहे. ईकोनाॅमिक क्लासने प्रवास करत कोलिंडा आपल्या संघाचे मनोबल वाढवण्यासाठी रशियाला पोहोचल्या ,देशाचा शर्ट घालात त्यांनी व्हिआयपी विभागात न बसता संघाला प्रेरीत करत राहील्या. अंतिम सामना हरल्यावरही आपल्या खेळाडुचे अश्रु पुसत त्याना सावरताना दिसल्या. सोहळा समापतीच्या कार्यक्रमात पावसात आपल्या खेळाडु सोबत त्यानी उभ राहण पसंत केल ,त्या खरतर स्वतःसाठी छत्री मागवू शकत होत्या मात्र त्यानी असे न करता आपल्या खेळाडूना सोबत करण पसंत केले. फुटबाॅलच्या खेळा दरम्यान त्यांनी आपला पगारही नाकारला. अश्या पध्दतीने खरतर कोलिंडा यांनी महिला नेतृत्व हे किती खंबीर ,सक्षम व विचारी असु शकते याचे उदाहरणच जगाला दाखवुन दिले आहे.

Updated : 18 July 2018 4:00 AM GMT
Next Story
Share it
Top