Home > मॅक्स वूमन > स्तनांचा (Breast) कॅन्सर

स्तनांचा (Breast) कॅन्सर

जगातील १८४ पैकी १४० देशांमध्ये स्तनांचा कॅन्सर स्त्रियांमध्ये नंबर एक वर ठाण मांडून आहे. आपल्या देशाचा विचार केल्यास २०१२ च्या रिपोर्ट नुसार सिर्विकल (cervix) कॅन्सरला मागे टाकून तो नंबर एक वर आला आहे. गेल्या पंचवीस वर्षात पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये कॅन्सर होण्याचे प्रमाण जास्त दिसून आले आहे. फक्त ग्रेटर मुंबईचा विचार केल्यास 2012 मध्ये 13,383 नवीन रुग्णाची नोंद झाली असून त्यामध्ये पुरुषांची संख्या 6,597 इतकी होती तर स्त्रियांची संख्या 6,786 इतकी होती. स्त्रियांमध्ये स्तनांच्या कॅन्सरचे 35% एवढे जास्त प्रमाण असून ३५ ते ६४ या वयोगटामध्ये स्तनांच्या कॅन्सरच्या 1964 केसेसची नोंद झाली आहे. मुबलक आणि आधुनिक उपचार सुविधा उपलब्ध असतांनाही ब्रेस्ट कॅन्सरमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या महिलांची संख्या खूप जास्त आहे. उशिरा होणारं निदान हे त्याचे प्रमुख कारण आहे. जर सुरुवातीच्या टप्प्यात कॅन्सरचं निदान झालं आणि तत्परतेनं त्यावर उपचार झाले तर कॅन्सरमधून सुटका होऊ शकते.

केवळ ५% स्तनाचा कॅन्सर ३५ वर्षा पूर्वी आढळतो. ८० टक्के रोग स्त्रियामध्ये मासिक पाळी बंद झाल्यावर आढळतो.

स्तनांचा कॅन्सर होण्याची करणे काय आहेत ?

स्तनांतील पेशींची वाढ व कार्य ही estrogen व progestorone या हार्मोन्सवर अवलंबून असते. पेशींची वाढ मुख्यतः estrogen मुळे होते त्यामुळे शरीरात estrogen ची मात्रा जास्त झाल्यास पेशी वाढत जाऊन कॅन्सर मध्ये रूपांतर होते. त्यामुळेच मासिक पाळी लवकर सुरु होणे किंवा फार उशिरा बंद होणे, मुल नसणे तसेच बदलत्या राहणीमानमुळे जसे व्यायाम न करणे, मुल न होऊ देणे, लठ्ठपणा, डायबेटीस, ब्लड प्रेशर आणि estrogen चे उपचार घेणे इत्यादी मुळे स्तनांच्या कॅन्सरचे प्रमाण वाढते. साधारणपणे ५ ते १० टक्के स्तनांचा कॅन्सर हा अनुवंशिक आजारामुळे होऊ शकतो.

स्तनांच्या कॅन्सरची लक्षणे व तपासणी:-

  • स्तनांत गाठ होणे
  • निप्पल मधून रक्तस्त्राव होणे
  • निप्पल स्तनात ओढले जाणे
  • बगलेत गाठ होणे
  • श्वास घेण्यास त्रास होणे
  • पाठीत दुखणे

(स्तनांत गाठ होणे म्हणून कॅन्सर झाला असे लगेच मानू नये कारण स्तनांत साध्या गाठी (fibroadenoma) असू शकतात. मासिक पाळी बंद झाल्यानंतर स्तनांत गाठ असेल तर कॅन्सर हे एक कारण असू शकते त्यामुळे तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली योग्य त्या तपासण्या करून घ्याव्यात.)

तपासणी:- रक्त तपासणी, छातीचा एक्सरे व सोनो मामोग्रफी करावी. खरोखरीच कॅन्सर आहे की नाही ते पाहण्यासाठी तुकडा काढून तपास करावा.

स्तनांच्या कॅन्सरचे उपचार कसे करावे?

स्तनांचा कॅन्सर साधारणपणे ६० ते ७० टक्के स्त्रियांमध्ये तिसऱ्या किवा चौथ्या टप्प्यामध्ये माहिती पडतो त्यामुळे रोग पूर्ण पणे बरा होण्याचे प्रमाण कमी आहे.

शस्त्रक्रिया, रेडीओथेरपी, केमोथेरपी आणि हार्मोनल थेरपी या सर्व प्रकारच्या उपचार पध्दती स्तनांच्या कॅन्सर बरा करण्यासाठी वापरल्या जातात. कुठली उपचार पध्दती कधी वापरायची हे रोग कितव्या टप्पात आहे त्याच्यावरून ठरवले जाते. ढोबळ मानाने स्तनाच्या कॅन्सरच्या रुग्णाचे उपचारासाठी चार प्रकारामध्ये वर्गीकरण केले जाते. रोग बरा करण्यासाठी सर्व रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज असते. या मध्ये मुख्यतः स्तन पूर्ण काढणे (mastectomy) किंवा फक्त गाठ कडून स्तन वाचविणे (breast conservation ) असे दोन प्रकार असतात. दोन्ही शस्त्रक्रिया सारख्याच असरदार आहेत पण इथे एक लक्षात घेतले पाहिजे की स्तन वाचविण्याची शत्रक्रिया केली असल्यास अश्या सर्व रुग्णांना रेडीओथेरपी घेणे जरुरी असते.

केमोथेरपीचे उपचार काही अपवाद वगळता जवळ जवळ सर्व टप्प्यात असणाऱ्या रोगसाठी वापरले जातात. केमोथेरपीचे उपचार दर आठवड्याने किंवा दर तीन आठवड्याने दिले जातात. तसेच परत परत उदभवणाऱ्या रोगासाठी दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रकारच्या किमोथेरपीचे उपचार तसेच टार्गेटथेरपी उपोयोगात आणली जाते. trastuzumab टार्गेट थेरपी अतिशय असरदार असून ज्या रुग्ण मध्ये cerB२ recepter आढळतात फक्त त्या रुग्णांना उपयोगी असते.

स्तन वाचविण्याची शत्रक्रिया केलेल्या सर्व रुग्णांना रेडीओथेरपी घेणे गरजेचे असते तसेच किमान ३डी- सी. आर. टी उपचार पध्दती अनुसरून रेडीओथेरपीशी संबंधित दुष्परिणाम कमीत कमी ठेवता येतात. स्तन पूर्ण काढल्यास (mastectomy) ज्यांची गाठ ५ सेंटीमीटर पेक्षा मोठी किंवा lymph node पॉजिटीव्ह अश्या सर्व रुग्णांना रेडीओथेरपी देणे गरजेचे असते. रेडीओथेरपी उपचाराचा कालावधी साधारणपणे एक ते दीड महिन्यापर्यंत लागतो. दुसरा टप्पा आणि पुढील टप्प्यात ई. बी. आर.टी रेडीओथेरपीची गरज लागतेच.

ज्या रुग्णांमध्ये ER / PR recepters positive आहेत त्या सर्वाना हार्मोनल थेरपी ५ ते १० वर्षासाठी दिली जाते तसेच ४ ते ६ महिन्यांनी रुग्णांना तपासणीस बोलाविले जाते. शस्त्रक्रियेनंतर किमान ८ ते १० महिने उपचार चालतात.

स्तन कॅन्सर स्क्रिनिग आणि तपासण्या:

स्तन (Breast) कॅन्सर: २० वर्ष पासून ३९ वर्षापर्यंत सर्व स्त्रिया स्वत: छाती तपासू शकतात किंवा दर ३ वर्षांनी दवाखान्यात जाऊन छाती तपासू शकतात. ४० वर्ष पासून पुढे दर वर्षी माम्मोग्राफी करावी.

डॉ. दिलीप निकम,

विभाग प्रमुख, कॅन्सर विभाग.

कामा व अल्ब्लेस हॉस्पिटल, मुंबई

[email protected]

Updated : 31 March 2017 12:10 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top