News Update
Home > Election 2020 > भाजपच्या प्रज्ञासिंहने शहीद आणि पोलिसांचा अपमान केला तरी 'चौकीदार' गप्पच ?

भाजपच्या प्रज्ञासिंहने शहीद आणि पोलिसांचा अपमान केला तरी 'चौकीदार' गप्पच ?

भाजपच्या प्रज्ञासिंहने शहीद आणि पोलिसांचा अपमान केला तरी चौकीदार गप्पच ?
X

२००८ च्य़ा मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भारतीय जनता पक्षातर्फे भोपाळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.या उमेदवारीनंतर आजारी असल्याचे सांगून जामीनावर सुटलेल्या प्रज्ञा सिंह या उमेदवारी कशी करू शकतात, असा सवाल उपस्थित करीत याबाबत या स्फोटात बळी गेलेल्यांच्या नातेवाईकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान, साध्वी प्रज्ञासिंह यांनी २००८ साली मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जीव गमवावा लागलेल्या पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याने त्यांच्यावर देशभरातून टीकेची झोड उठली आहे.सोशल मिडियासह राजकीय पक्षांनीही साध्वीवर टीकेची तोफ डागली असून यासंदर्भात मोदींनी देशाची माफी मागावी, अशी मागणी राजकीय पक्षांकडून केली जाते आहे.

काय म्हणाली साध्वी प्रज्ञासिंह ?

हेमंत करकरे आपल्या कर्मामुळेचे मारले गेले असून त्यांनी मला खोट्या केसमध्ये अडकवले. त्यांना याची शिक्षा मिळाली असल्याचे वक्तव्य साध्वींनी केले होते. दहशतवाद्यांनी करकरे यांना मारुन माझे सुतक संपवले असल्याचे अतिशय धक्कादायक वक्तव्य त्यांनी केले आहे. हेमंत करकरे यांनी माझ्यासोबत चूकीचा व्यवहार केला आणि मला याप्रकरणात अडकवल्याचा आरोप प्रज्ञासिंह यांनी केला होता. तसचे करकरे हे देशद्रोही, कुटिल आणि धर्मविरोधी होते असे वादग्रस्त विधानही साध्वींने केले होते.

प्रज्ञासिंहवर काय आहेत आरोप ?

29 सप्टेंबर 2008 रोजी नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये अंजुमन चौक आणि भीकू चौक यांच्यामधील शकील गुड्स ट्रान्सपोर्टसमोर एक स्फोट झाला होता. या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला होता तर 101 जण जखमी झाले होते. या स्फोटासाठी एका मोटारसायकलचा वापर करण्यात आला होता. NIAच्या अहवालानुसार, या मोटारसायकलची नोंदणी प्रज्ञा ठाकूर यांच्या नावावर होती. महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाने (ATS) हेमंत करकरे यांच्या नेतृत्वात या प्रकरणाची चौकशी केली आणि या मोटारसायकलीचे संबंध सुरत आणि प्रज्ञा ठाकूर यांच्याशी असल्याचे समोर आले. प्रज्ञासिह अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्याही सदस्य होत्या. पोलिसांनी या प्रकरणाची नाशिक, पुणे आणि भोपाळध्ये चौकशी केली. याप्रकरणी लष्कराचे अधिकारी कर्नल प्रसाद पुरोहित आणि सेवानिवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात पुढे हिंदुत्ववादी संघटना 'अभिनव भारत'चे नाव समोर आले आणि सुधाकर द्विवेदी उर्फ दयानंद पांडेय यांचेही नाव समोर आले.

मोटारसायकल आणि प्रज्ञा यांचं काय होता संबंध ?

एटीएसच्या आरोपपत्रानूसार प्रज्ञा ठाकूर यांच्याविरोधात सर्वांत मोठा पुरावा मोटारसायकल त्यांच्या नावावर असणं, हा होता. पण मालेगाव हल्ल्याच्या दोन वर्षांपूर्वी रामजी कलसांगरा नावाची एक व्यक्ती तिचा वापर करत होती, असे सांगण्यात आले. या प्रकरणात कलसांगरा या इंदूरच्या एका व्यापाऱ्यालाही अटक करण्यात आली होती. यानंतर प्रज्ञा यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली. चौकशी अधिकाऱ्यांना मेजर रमेश उपाध्याय आणि कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यामधील एक संभाषण मिळालं, ज्यामध्ये मालेगाव स्फोटातील प्रज्ञा यांच्या भूमिकेविषयी उल्लेख होता. या चार्जशीटमध्ये प्रज्ञा सिंह यांना दोषमुक्त ठरवण्यात आलं होतं. त्यांच्यावरील मोक्का हटवण्यात आला आणि प्रज्ञा ठाकूर यांच्यावर करकरे यांनी केलेली कारवाई सुसंगत नव्हती, असे सांगण्यात आलें.

दरम्यान, ,न्यायालयाने साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्यावरीलमोक्काहटवला असला तरी अजूनही त्यांच्यावर बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत सुनावणी सुरु आहे

Updated : 19 April 2019 12:24 PM GMT
Next Story
Share it
Top