'फ्रेंडशिप डे' च्या दिवशी सोनाली बेंद्रेची भावनिक पोस्ट
X
आज फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने अनेकजण मैत्री दाखवण्या साठी आपल्या मित्रांसोबतचे वेगवेगळे फोटो पोस्ट करत असतात. मैत्री ही अनेक कारणांमुळे होत असते. यात काही जण तर अगदी जिवाभावाचे मिळतात. मित्राच्या प्रत्येक सुख दुःखात प्रत्येक अडचणीत साथ देणारे मित्र आपण नेहमीच पाहत असतो. यात जर तुम्ही एखाद्या आजाराने त्रस्त असाल आणि तुमचे मित्र तुम्हाला भेटले तर त्या आनंदाला मर्यादा नसते. असच काहीस सोनाली बेंद्रेसोबत घडलंय. कर्करोगाने त्रस्त असलेल्या सोनालीला फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने तिच्या खास मैत्रिणी भेटायला गेल्या आणि हे आंनदी क्षण अभिनेता हृतिक रोशनने कॅमेऱ्यात टिपले. या फोटोतील तिच्या चेहऱ्या वरील तेज अनेकांना थक्क करणारे आहे. या फोटो मध्ये सोनाली सोबत गायत्री आबेरॉय आणि सुझान खान दिसत आहेत. या फोटोखाली तिने जो संदेश दिलाय तो अनेकांना ऊर्जा देणारा आहे. यात तिने ‘आपण आता प्रत्येक क्षणाचा मनमुराद आनंद लुटण्यास सुरुवात केली आहे. हो, ही मीच आहे आणि मी प्रचंड आनंदात आहे. हे अगदी खरं आहे आणि मी तुम्हाला यामागचं कारणही सांगते, आनंद मिळवण्याच्या प्रत्येक संधीचं मी सोनं करत आहे. अर्थात काहीदा यातनाही सहन कराव्या लागतात. पण, माझ्यासोबतच्या व्यक्तीमुळे मी फार आनंदात आहे’, असं म्हटलं आहे.