Home > मॅक्स ब्लॉग्ज > ऑनलाइन सिरीज – छोटा पदडा बडा धमाका

ऑनलाइन सिरीज – छोटा पदडा बडा धमाका

ऑनलाइन सिरीज – छोटा पदडा बडा धमाका
X

ऑफिसमधून धावतपळत घरी आल्यावर आधी रिमोट हातात घेऊन आवडती सिरीअल पाहणं किंवा रामायण महाभारतासारख्या सिरीअल लागल्यावर सामसूम होणारे रस्ते हे कालबाह्य झालंय. साप्ताहिक सीरिअल तर सोडाच डेली सोपसुध्दा आता आऊटडेटेड होऊ लागल्यात. याउलट ऑफिसमध्येच असताना आपल्या आवडत्या वेबसीरीजचा एपिसोड किंवा पूर्ण सीजनचं डाउनलोड करून तो मेट्रो किंवा ट्रेनमध्ये बसल्याबसल्या लगेच पाहाणे हे नवा ट्रेन्ड आहे.

मनोरंजन जगतात गेल्या काही वर्षात भूतो न भविष्यती उत्क्रांती झाली. त्याचचं पुढचं पाऊल म्हणजे सास-बहु सिरिअल्सचे निर्मातेसुध्दा आता ऑनलाइन विश्वाकडे वळलेत. याचचं ताजं उदाहरण म्हणजे साराभाई व्हर्सेस साराभाई या अफलातून कॉमेडी सीरीअलचा पुढला सीजन हॉटस्टार या ऍपवर लाँच करण्यात आला. हे विश्व लार्जर दॅन लाइफ आहे. सासबहु सागाला टाळून प्रामुख्याने नवनवीन विषय या वेबसीरीजचा पाया असल्यामुळे युवा प्रेषक वर्ग याकडे वळलाय, त्यातच नो जाहिराती आणि नो सेन्सोरशिप. कॉमडी, हॉरर, ऍक्शन, रोमान्स किंवा थ्रीलर. युवर विश इज वेबसीरीज कमांड. त्यामुळे हळूहळू टीव्ही रेटींग्स घसरतायेत.

वेबसीरीजच्या वाढत्या मार्केटचा पहिला प्रत्यय 2016 साली आला जेव्हा नेटफ्लीक्स आणि अमेझोन प्राइम या सारख्या बड्या व्हिडीओ ऑन डिंमांड कंपनीजनी भारतात पाऊल ठेवलं. ज्या पाठोपाठ आता हॉटस्टार(स्टार), व्हूट (Viacom 18) आणि टीव्ही सिरीअल क्वीन एकता कपूरचं फ्रेशली लॉन्च ALT बालाजी हे ऑन डिमांड व्हिडिओ ऍप्स आलेत. अशा ऍप्सची यादी बरीच मोठी आहे.

वेबसिरीजची मुहूर्तमेढ

सगळ्या भारतीय वेबसिरीजची पंढरी म्हणजे युट्यूब. ज्याने अनेकांना आपल्या खुलं व्यासपीठ देऊ केलं. यापैकी प्रमुख नाव म्हणजे ऑल इंडिया बकचोद (एआयबी) आणि द व्हायरल फीव्हर (टीव्हीफ). एआयबीची सुरूवात तन्मय भट आणि गुरसिम्रन खाम्बा यांनी स्टँडअप कॉमेडीने केली. तर टीव्हीफची सुरुवात एमटीव्ही या युथ चॅनलने दिलेल्या नकाराने झाली. टीव्हीफचे अरूणभ कुमार यांच्या वेबसीरीजचा यूएसपी म्हणजे आधुनिक विषय हलकीफुलकी मांडणी. उदा. परमनंट रूममेटस्.

वेबसीरीजचं फ्रेश टॅलेंट

मिथिला पालकरसारखा फ्रेश मराठी चेहरा हा वेबसीरीजचा फाइंड आहे. मिथिला ही वेबसीरीजची खऱ्या अर्थाने सेलिब्रिटी फेस ठरलीयं. जी लवकरच मुरांबा या आगामी मराठी चित्रपटात झळकणार आहे. तिच्याच सारखे अनेक फ्रेश टॅलेंट वेबसिरीजमुळे मिळालेत. आतातर वेबसीरीजच्या बूममुळे सेलिब्रीटीजही वेबकडे वळतायेत. उदा. साक्षी तन्वर आणि राम कपूर यांची ALT बालाजीवरील ‘कर ले तू भी मोहोब्बत’ ही सीरीअल.

महत्त्वाचं म्हणजे या वेबसिरीजमध्ये तरुणांना आकर्षित केले जातील असेच विषय हाताळले जात आहेत. २० मिनिचांच्या आसपास एक व्हिडीओ किंवा एपिसोड असतो आणि कित्येकदा १२ एपिसोडमध्ये अख्खि स्टोरी संपते. त्यामुळे फार बोर न होता अख्खि सिरीज पाहता येते. काही इंटरेस्टींग स्टोरीज मात्र पेड असतात. साधारण १०० ते २०० रुपये भरून त्या पाहता येतात. त्यासाठी पेमेंटचे सेफ आणि वेगवेगळे ऑप्शन उपलब्ध असतात. सिनेमासाठी ५०० रुपये देणारी आजची जनरेशन अख्ख्या वेबसिरीजसाठी हसतहसत १००-२०० रुपये देत आहे. शिवाय हवं त्यावेळी आणि हवं त्या ठिकाणी मनोरंजन मिळाल्यावर आणखी काय पाहिजे?

आहे की नाही इंटरेस्टींग? मग तुमची आवडती वेबसीरीज कोणती आहे? नसेल तर हा सहज उपलब्ध आणि नाविन्यपूर्ण ट्रेंड नक्की ट्राय कराच.

- अदिती दातार-भातंब्रेकर

Updated : 18 May 2017 7:27 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top