'यूएन'मध्ये नीलम गोऱ्हेंनी मांडले विचार
X
महिला शोषण आणि सायबर क्राईम या विषयावर शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या कृतीसत्रात विचार मांडले. संयुक्त राष्ट्र संघाच्या जागतिक महीला आयोगाचे ६१ वे सत्र सध्या न्यूयॉर्क येथे सुरु आहे. 'बदलत्या विश्वात स्त्रियांच्या आर्थिक सक्षमीकरणातील आव्हाने व आवश्यक घोरणे' या विषयावर या सत्रात विचारमंथन होत आहे. इंग्लड, जागतिक श्रमिक संघटना आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या अनेक विभागांनी घेतलेल्या या कृती सत्रात आमदार नीलम गोऱ्हे यांनी सायबर क्राईमसोबतच इतर काही विषयांवर विचार मांडले. संयुक्त राष्ट्रांच्या मानव अधिकार, गुलामगिरी विषयक विशेष दूत ऊर्मिला भूला यांनी त्याबाबत दखल घेतली आहे. ब्राझीलमध्ये सायबर क्राईमबाबत नवा आधुनिक व प्रागतिक कायदा केला जात आहे त्यांवर आपण महाराष्ट्र व भारतात पाठपुरावा करणे महत्वाचे ठरेल असे यावेळी त्यांनी सांगितले.