- ठाकरे सरकारने घेतलेत हे मोठे निर्णय ...
- नुपूर शर्माचे समर्थन करणाऱ्या टेलरची हत्या, व्हिडीओतून पंतप्रधान मोदी यांनाही धमकी
- पाऊस असमाधानकारक, पेरण्या खोळंबल्या;मंत्रिमंडळ बैठकीत खरीप हंगामाचा
- राज्यात ७२३१ पोलीस शिपाई भरती होणार :गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
- कुर्ला इमारत दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्र्यांची मदत
- मुंबईतील इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली
- कुर्ला इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, बचाव कार्य सुरूच
- राजकीय सत्तानाट्यात दिवसभरात काय घडले?
- Alt news चे सहसंस्थापक मोहम्मद जुबैर यांना अटक
- सांगलीतील 9 जणांची आत्महत्या नव्हे हत्या, गूढ उलगडलं

पण, माझं लग्न नाही ठरल तरं? भाग- 2
X
प्रेमात पडणं हा निसर्ग नियमच आहे. पण, इथं प्रेम, आकर्षण, समोरची व्यक्ती, आपलं आयुष्य याचा सारासार विचार करायला शिकुया. दुसऱ्या जातीवर जडलेल प्रेम. घेऊन जाऊया आई बाबांना डॉमिनोजला आणि बिंधास्त सांगूया...
प्रितम : हो ना, बघ कॉलेज असत नेमकं कशासाठी? आपल्या विचारांचं विश्व समृध्द करण्यासाठी. जातधर्म, मासिक पाळी, सेक्स, आंतरजातीय विवाह, स्त्री -पुरुष समानता, रूढी परंपरा, विचारांचं विश्व वाढवण्यासाठी. कधी पुस्तक वाचून, कधी चर्चा करून, व्याख्यान ऐकून, वादविवाद स्पर्धा बघून, नेटचा वापर करून समृद्ध करण्यासाठी. तीचं जग अगदी अगदी आभाळगत झालं पाहिजे बघ.
ती डॉक्टर होऊ दे नाहीतर आयएएस, नाहीतर अजून कोणी. वेळीच हे नाही समजलं तिला तर जग गुंडाळायला तयारच आहे सारं. तिला सांगायचंय मला की, अपडेटेड ज्ञान नाही, ही लाजयची नाही. लाज वाटण्याची गोष्ट आहे.
प्रितमचं इतकं मनापासूनच बोलणं एकूण गार्गी एक घट्ट मिठी मारते त्याला. जर सगळ्या मुलांचे विचार असे झाले तर मुलींना किती मोकळेपण मिळेल ना रे? आज गार्गीच्या श्वासात सुद्धा स्वातंत्र्य दरवळत होतं. त्यांचे श्वास त्यांच्या नजरा त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपणाऱ्या क्षणात एकमेकांत गुंफून जातील इतक्यात कान देऊन ऐकणारी कृष्णा दिसते गार्गीला. चर्चेचा सूर कृष्णेलाही कळलेला. गार्गी तिला आत बोलावते आणि म्हणते, बोल कृष्णा काय चाललंय तुझ्या मनात?
कृष्णां : ताई, पर कॉलेजात तर माप पोर असत्यात नव्हं. मग, कायबाय झालं तर?
गार्गी : हा हा हा...झालं तर होऊ दे की, मी तर बिंधास्त मुलांसोबत बोलायला सांगेन तिला. बिंधास्त निखळ मैत्री जपायला सांगेन हं.
कृष्णां : पण ताई वीशी उलटली वयाची की वादळ सुरू होणारच की...माझ्यागत प्रेमात बिमात पडली बिडली तर?
प्रितम : कृष्णा, प्रेम हा निसर्ग नियमच आहे. जीवनाच्या या वाटेवर घरच्यांइतकच कोणीतरी जवळच वाटू लागतं. बिंधास्त वाटू दे की तिला. मी इतकं जवळचा होईन की ती 10 मैत्रिणीकडे मित्रांकडे सांगण्यापेक्षा माझ्याकडे येऊन बिंधास्त सांगेन. तसं आमच्या झाशीच्या राणीला म्हणजे गार्गीला नाही जमलं ते (एकदम हसत) आणि कृष्णा, तुला सांगतो. टेन्शन आलं तेव्हा तर सैराटच्या अर्चिचा फोटो लावलेला हिनं मोबाईलच्या स्क्रीनवर...
कृष्णां : आग बाई बाई बाई, पण पण. ते परिम, त्यो गडी...आपलं समदं आयुष्य याचा सारासार इचार करायला पाहिजे बगा. कोण कोण नाही शिकवत बगा त्यावेळी हे. त्या वेळला जे खरं समजून घेत, श्यानपन देत, तेच खरं नशीबवान. पण नसलं त्यावेळी कोणी आपलं डोकं तर वापरायच पायजे. पण पण ताईसायेब जर त्यो दुसऱ्या जातीतला असला तर?
गार्गी : अरे वा ! म्हणजे आमचाच पायंडा पुढं नेला तर. अरे प्रित आठवतंय तुला, आधी प्रेमाच दडपण आणि वर घरच्यांच्या संस्कारांचं दडपण. एकीकडे फुलपाखरासारखं छान वाटणं आणि एकीकडे त्याच फुलपाखराचं काडीपेटीत घुसमटणं सुरु झालेलं ना माझं...
प्रितम : हो ना, कस सांगू, काय सांगू करत नखरे करत बसायचीस ना तू... किती वेळा सांगितलं तुला. घेऊन जा आई बाबांना डॉमिनोजला. बिंधास्त सांग यार त्यांना. तर तुझी नाटकं, "इतकं मोकळेपणात नाही वाढले मी. मला नाही जमणार हे. नाही शिकले मी असं बोलणं." शेवटी यासाठी एकच उत्तर दिलं मी कृष्णा हिला. आयुष्यभर रडत बस मग. हिच्या आईने कधी तिला शिकवला का बर्गर खायला? शिकलीसच ना खायला तरीही. मग? स्वतःसाठी बोलायला काय असिस्टंट ठेवायचा का हिनं? काय काय होईल? एकतर सगळं चित्रपटासारखं गोडगोड होईल किंवा दंगा होईल.
गार्गी : पण या दंग्यानंच तर आयुष्य खऱ्या अर्थाने प्रगल्भ केल ना रे आपलं? आपण शिकलेली समानतेची थेअरी आणि प्रॅक्टिकल याचा दुरान्वये संबधं नाही हे तेव्हाच तर कळालं आपल्याला..
प्रितम : हो बघ ना... अगदी मुलासारखं वाढवणारे बाबा अचानक तुला परक्याचं धन समजायला लागले, भावाला अचानकच इज्जत वेगेरे आठवायला लागली, नाक कापलं वेगेरे शब्द कानावर पडायला लागले.
गार्गी : हो ना... कधीही संबंध न आलेल्या सगळ्या नातेवाईकांना एक आवडीचा विषय मिळाला. बहिणीला तिच्या भविष्याच्या चिंतेन नको नकोसा झालेलास तू, सगळ जग आपल्याला जात धर्माची प्रवचन देऊ लागलेले...
कृष्णा : व्हय हे पण अन असं बरंच काय मलाबी झालेलं. मी समदी तुटून गेलती बघा. पार इचाराचं डोकं संपलेलं बघा. पर या वेळी म्या उठली. झेप घेतली. आत्महत्येच्या इचारांना जगण्याकडं वळवलं. ठाम राहिले. स्वतःशी इमानी राहिले. एक बाई म्हणून नाही तर एक माणूस म्हणून बघितलं स्वतःकडं. पण तरीबी. मला येडं बनवून पळून गेला ओ त्यो विन्या...(डोळ्यातलं पाणी लपवत)
क्रमशाः
डॉ. चारुशीला
भोपाळ
9689865748