Home > मॅक्स वूमन > नवरात्र स्पेशल रेसिपी

नवरात्र स्पेशल रेसिपी

नवरात्र स्पेशल रेसिपी
X

सारणाची गोड साबुदाणा कचोरी

नवरात्राचा उपवास करणाऱ्या महिलांना पोषणात कमतरता येऊ नये, पदार्थात विविधता राहावी म्हणून नावीन्यपूर्ण रेसिपी सुचवत आहे. उत्सवाचा आनंद यातून नक्कीच वाढेल.

साहित्य

रात्रभर भिजवलेले साबुदाणे, उकडलेले रताळे, आर्धा तास दुधात भिजवलेले ड्राय फ्रुटस्, खोवलेलं खोबरं, साजुक तूप, वेलची पावडर, खवा, साखर चवीप्रमाणे.

सारण बनवण्याची पद्धत

एका पातेल्यात साजुक तूप गरम करून घ्या. ड्राय फ्रुटस् परतवल्यावर त्यात खोवलेलं खोबरं, साखर वेलची पूड आणि मावा घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. आशा प्रकारे कचोरीचे स्टफिंग तयार आहे.

कचोरी कृती

उकडून स्मॅश केलेले रताळे आणि रात्रभर भिजवलेले साबुदाणे एकत्र मिक्स करून त्याचा एक गोळा बनवून घ्या. त्याचा एक छोटा गोळा घेऊन त्याचा द्रोण करा. त्यामध्ये आधी बनवलेलं थोडे सारण भरून द्रोणाचं तोंड बंद करा. अशा सर्व पिठाच्या कचोरी बनवून घ्या.

मग एका कढईत तूप अथवा तेल गरम करून कचोऱ्या सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. गरमागरम सर्व करा.

Updated : 22 Sept 2017 9:19 PM IST
Next Story
Share it
Top