Home > मॅक्स व्हिडीओ > अतिरिक्त दुधाचा प्रश्न का निर्माण झाला?: सत्यजित देशमुख

अतिरिक्त दुधाचा प्रश्न का निर्माण झाला?: सत्यजित देशमुख

अतिरिक्त दुधाचा प्रश्न का निर्माण झाला?: सत्यजित देशमुख
X

कधी नव्हे ते इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता तुम्ही म्हणाल लोकांनी दूध वापरायचं बंद केलं आहे का? तर निश्चित नाही. दुधाचा घरगुती वापर कायम आहे. मात्र, दुधापासून जे इतर पदार्थ तयार केले जातात. त्यांचा प्रश्न कायम आहे.

कारण दुधापासून तयार होण्याऱ्या पदार्थांची मागणी थांबली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट बंद असल्यानं दुग्धजन्य पदार्थांची मागणी थांबली आहे. अशा परिस्थिती याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होत आहे.

मागणी थांबली की, मालाचा अतिरिक्त साठा निर्माण होतो. अशा परिस्थितीत राज्यात मोठ्या प्रमाणात दूध शिल्लक राहत आहे. दुधाची मागणी घटल्यानं ग्रामीण अर्थव्यवस्थेतील दुधाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न कसा सोडवता येईल? या संदर्भात शेतकरी नेते सत्यजीत देशमुख यांनी मॅक्समहाराष्ट्र शी केलेली खास बातचित

Updated : 4 Aug 2020 7:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top