Home > मॅक्स व्हिडीओ > फेसबूक च्या भूमिकेवर जगभरात प्रश्नचिन्ह का निर्माण होतंय: श्रीरंजन आवटे

फेसबूक च्या भूमिकेवर जगभरात प्रश्नचिन्ह का निर्माण होतंय: श्रीरंजन आवटे

फेसबूक च्या भूमिकेवर जगभरात प्रश्नचिन्ह का निर्माण होतंय: श्रीरंजन आवटे
X

भाजपच्या (BJP) काही नेत्यांनी मुस्लीम धार्मिक द्वेष निर्माण करणाऱ्या पोस्ट केल्या होत्या. मात्र, सोशल मीडियाच्या माध्य़मांनी या पोस्टवर काय कारवाई केली का? आता हा मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे. या संदर्भात अमेरिकेतील The Wall Street Journal ने एक वृत्त प्रसारीत केलं आहे. या वृत्तात फेसबूक भाजपला कशा पद्धतीने मदत करत आहे. या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. या संदर्भात लेखक श्रीरंजन आवटे (shriranjan awate) यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बातचित केली.

त्यांच्या मते ही बातमी आल्यानंतर अनेकांना धक्का बसला. मात्र, या बातमीत धक्कादायक असं काही नव्हतं. अमेरिकेत (america) 2016 ला ज्या निवडणूका झाल्या. त्या निवडणुकांमध्ये फेसबूकने घेतलेल्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. त्याचबरोबर फेसबूक (Facebook) ने ब्रेक्झीट बाबत घेतलेल्या भुमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. या बाबत न्यायालयात केस स्टॅंड झाल्यानंतर मार्क झुकेरबर्ग ला स्वत: आपली भूमिका मांडावी लागली. मात्र, या निमित्ताने फेसबूकच्या भूमिकेवर वारंवार प्रश्न का उपस्थित होतात? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

2019 च्या निवडणुकांच्या तोंडावर परंजॉय गुहा ठाकुरता आणि त्यांच्या सहकाऱ्याने the real Face of Facebook या सदराखाली 4 लेख प्रसिद्ध केले होते. या लेखात त्यांनी फेसबूक भाजपचे पेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचतील यासाठी मदत करत होते. असं या लेखात म्हटल्याचं श्रीरंजन आवटे यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना सांगितले.

मध्यंतरी What’s app च्या spy बाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्याचं पुढं काय झाले? असा सवाल करत आवटे यांनी सध्या फेसबूक व्हाट्स अप ची मालकी मार्क झुकेरबर्ग कडे आहे. आणि मार्क झुकेरबर्ग भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेत जुळवून घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांना मदत करत असेल तर आपण मार्क झुकेरबर्गला प्रश्न विचारायला हवे. आणि आत्ता निर्माण झालेल्या या सर्व प्रकरणावर फेसबूक ने आपली प्रतिक्रिया द्यायला हवी. असं मत श्रीरंजन आवटे यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना व्यक्त केलं आहे.

नक्की काय प्रकरण?

मोदी (Modi) सरकार नाराज झाले तर फेसबुकच्या (Facebook) भारतातील व्यवसायावर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करत भाजप (BJP) नेत्याच्या मुस्लिम विरोधी पोस्टवर कारवाई करण्यास फेसबुकच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने विरोध केल्याची धक्कादायक माहिती या रिपोर्टमध्ये दिली आहे.

अमेरिकेतील The Wall Street Journal च्या वृत्तानुसार भाजपचे तेलंगणामधील आमदार टी. राजा सिहं (T. Raja Singh) यांच्या फेसबुक पोस्टला प्रक्षोभक वक्तव्यांचे नियम लागू करण्यास फेसबुकच्या भारतातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने विरोध केला होता. टी. राजा यांची एक पोस्ट, काही हिंदुत्ववादी लोक आणि समुहांच्या द्वेषाधारित पोस्ट या हिंसेला प्रवृत्त करु शकतात, असे फेसबुकच्या अंतर्गत धोरणानुसार सिद्ध झाले होते. तरीही फेसबूकच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरुन या पोस्ट डीलिट करण्यात आलं नसल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

https://youtu.be/St2ozWg7avQ

Updated : 21 Aug 2020 1:24 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top