Home > मॅक्स व्हिडीओ > knowledge Economy तयार करणं काळाजी गरज: पृथ्वीराज चव्हाण

knowledge Economy तयार करणं काळाजी गरज: पृथ्वीराज चव्हाण

knowledge Economy तयार करणं काळाजी गरज: पृथ्वीराज चव्हाण
X

आज राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भविष्यातील महाराष्ट्र कसा असावा? या संदर्भात आपलं व्हिजन मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना मांडलं. यामध्ये त्यांनी देशामध्ये महाराष्ट्र बऱ्याच क्षेत्रात पुढं आहे. मात्र, अजुनही काही क्षेत्रात काम करणं गरजेचं असल्याचं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना व्यक्त केलं आहे.

यावेळी त्यांनी विस्तृत अशा महाराष्ट्रात अजुनही असमतोल असल्याचं सांगत यावर काम करणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं आहे. आपल्या पूर्ण उत्पन्नाच्या 75 टक्के उत्पन्न फक्त 5 जिल्ह्यातूनच येतं. हे पाच जिल्हे म्हणजे मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आणि रायगड ही आहेत. ही पाच जिल्हे सोडता राज्यातील इतर जिल्हे औद्योगीक दृष्ट्या प्रगत नाही. यामध्ये प्रगती करणं गरजेचं असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रातील भौगोलिक क्षेत्रामुळं राज्यात जो काही पाऊस होतो. त्यामधील मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जातं. देशातील सर्वात जास्त धरणं महाराष्ट्रात आहेत. मात्र, आत्तापर्यंत फक्त 18 टक्के क्षेत्र आपण सिंचनाखाली आणलं आहे. त्यामुळं शेतीवर अवलंबून न राहता औद्यागिक क्षेत्रावर भर देणं गरजेचं आहे. सेवाक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणं गरजेचं आहे.

हे ही वाचा...


चिंताजन: राज्यात एकाच दिवसात आढळले 1 हजार रुग्ण, तर 26 रुग्णांचा मृत्यू…

आम्ही तिथे पोहोचू तेव्हा…

साठीचा महाराष्ट्र आणि प्रशासकीय व्यवस्था

आपल्या देशात मोठ्या प्रमाणात खनिजं आढळत नाही. जवळ जवळ 85 टक्के तेल आपण आयात करतो. आपण खनिज संपत्तीच्या बाबतीत संपन्न नाहीत.

त्यामुळं आपल्याला ‘ज्ञानधिष्ठीत अर्थव्यवस्था’ knowledge Economy तयार करायला पाहिजे. अशा प्रकारची अर्थव्यवस्था जपान, दक्षिण कोरिया, इस्राइल या देशांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर संपत्ती तयार केली आहे आपल्या राज्याला आणि देशाला देखील याच प्रकारची अर्थव्यवस्था करायला पाहिजे. ही अर्थव्यवस्था निर्माण करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे.

मात्र, दुर्दैवानं आपल्याकडं विश्वविद्यालयामध्ये आपण ज्ञाननिर्मिती करण्यात कुठं तरी कमी पडलो आहोत. त्यामुळं आपल्या भारतातील विद्यार्थी परदेशात जातात. तिथं नाव कमावतात. देशात दिला जाणाऱ्या शिक्षणाच्या दर्जा बाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. तसंच आपल्या देशातील अनेक तरुण उच्च शिक्षण घेतल्यानंतर बाहेर जात आहेत. ज्ञान ही आपली संपत्ती आहे. या ज्ञानाचा योग्य उपयोग करणं गरजेचं असून knowledge to Wealth ज्ञानातून संपत्ती अशी अर्थव्यवस्था निर्माण करण्याची गरज चव्हाण यांनी यावेळी विषद केली.

हे ही वाचा...


डाव फसला! -निखिल वागळे

‘या’ तीन कायद्यांनी केले शेतकऱ्यांचे तीन तेरा

देवेंद्र फडणवीस का होत आहेत ट्रोल?

महाराष्ट्र समोरची आव्हानं कोणती? याबाबत बोलताना चव्हाण यांनी शाश्वत शेती, तसंच बेरोजगारी बरोबरच शिक्षण, आरोग्य, पर्यावरण या Soft infrastructure क्षेत्रातही आपलेल्या प्रगती करावी लागणार असल्याचं मत व्यक्त केलं आहे. Physical Infrastructure, Soft infrastructure यावर समान भर द्यावा लागणार आहे. वाढतं शहरीकरण आणि शहराचं नियोजन करणं गरजेचं आहे. त्यामुळं आगामी काळात सेवा क्षेत्रावर भर देऊन, knowledge to Wealth ज्ञानातून संपत्ती अशी अर्थव्यवस्था निर्माण करण्याची गरज आपल्या राज्याला आहे.

मात्र, हे सगळं करत असताना तितकं दूरदृष्टी असलेलं नेतृत्व आपल्याला सर्वच क्षेत्रात हवं तरच आपण पुढं जावं. असं चव्हाण यांनी म्हटलं आहे. कोरोना च्या लढाईत आपण नक्की विजयी होऊ असा आशावाद व्यक्त करताना, सध्या तरी आपण या लढाईत कोणत्या दिशेने जात आहोत. इतक्यात सांगणं कठीण आहे. असं मत आज राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भविष्यातील महाराष्ट्र कसा असावा? या संदर्भात आपलं व्हिजन मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना मांडलं आहे.

Updated : 1 May 2020 5:56 PM GMT
Next Story
Share it
Top