कमोडिटी मार्केटमध्ये सोने खरेदी विश्वासार्ह आहे का?

लॉकडाऊन काळात सोन्याचे भाव वाढत आहेत. अशा परिस्थितीत सोने खरेदी करुन जो तो जास्त पैसा कमवण्याचा विचार करतो. मात्र, लॉकडाऊनच्या काळात सोने खरेदी करायचे असल्यास तुम्ही कसे खरेदी कराल? तुमच्या भागातील सोनाराची दुकानं बंद असतील तर अशा वेळी सोन्यामध्ये कशी गुंतवणूक करता येईल?

या संदर्भात जळगाव येथील सोन्याचे प्रसिद्ध व्यापारी स्वरुप कुमार लुंकड यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बातचित केली.
अलिकडे सर्व उद्योगधंद्यामध्ये मंदी असल्यानं गुंतवणूकदारांना एक प्रश्न भेडसावतो, तो म्हणजे ‘गुंतवणूक नेमकी कुठे करावी ?’ आणि कशी करावी?

गुंतवणूकदारांना त्यात परतावा, सुरक्षितता आणि जोखीम या बाबींकडे लक्ष द्यायचं असतं. अशा परिस्थितीत शेअर्स, मुच्युअल फंड, बॉण्ड्स अशा अनेक पर्यांयांना लोकांनी आपलेसे केले आहे. पण या सर्व माध्यमांचे व्यवहार मागे पडले असून व्यापाराचे नवीन माध्यमं उदयाला आले आहे. ते म्हणजे ‘कमोडिटी डेरीव्हेटिव्हज’ म्हणजेच ‘वायदा व्यवहार बाजार’.

हे ही वाचा…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शंकरराव खरात यांची पहिली भेट…

भारतात संशोधनाचं घोडं कुठं अडतंय?

सावधान! देशाची बॅकींग व्यवस्था धोक्यात: विश्वास उटगी…

युरियाचा तुटवडा का? ‘ही’ आहेत 5 कारणं…

काय आहे ‘कमोडिटी मार्केट’? ‘कमोडिटी मार्केट’ मध्ये सर्वसामान्याने सोन्याचा व्यवहार कसा करावा? लॉकडाऊन काळात सोन्याचे भाव का वाढताहेत? येणाऱ्या काळातही सोन्याचे भाव कसे असतील. सोने सुरक्षित गुंतवणूक आहे का? सध्या बँकांचे ठेवींवर व्याज, शेअर मार्केट, म्युच्यूअल फंड परतावा कमी आहे का? लॉकडाऊन काळात प्रत्यक्ष सोने खरेदी विक्री ठप्प असताना कमोडिटी मार्केटद्वारे सोन्याचे व्यवहार सर्वसामान्यांनी करावे का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here