Home > Max Political > मोठ्या भावाला जाऊन भेटणार – उद्धव ठाकरे

मोठ्या भावाला जाऊन भेटणार – उद्धव ठाकरे

मोठ्या भावाला जाऊन भेटणार – उद्धव ठाकरे
X

आज देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देताना शिवसेनेवर निशाणा साधला होता. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांची महाआघाडीच्या मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून निवड करण्यात आली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर देखील खास ठाकरे शैलीत निशाणा साधला.

उद्धव ठाकरे यांनी ही निवडणूक झाल्यानंतर आपण दिल्लीला जाऊन मोठ्या भावाची भेट घेणार असल्याचं सांगत मोदी, अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.

शिवसेनेने नंबरगेम लक्षात घेतला आणि त्यांनी न ठरलेली गोष्ट रेटली. अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद हे ठरलेलंच नव्हतं. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या आरोपाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांची खुर्ची काट्याची खुर्ची आहे. जाणारे मुख्यमंत्री त्याला खिळे लावून जातो असं म्हणत फ़डणवीस यांच्यावर निशाणा साधला.

शिवसेनेने नंबरगेम लक्षात घेतला आणि त्यांनी न ठरलेली गोष्ट रेटली. अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद हे ठरलेलंच नव्हतं. अमित शाह यांनीही ही गोष्ट स्पष्ट केली. शिवसेनेने पहिल्या दिवसापासूनच धमकी देऊन कुणाहीसोबत जाऊ असं म्हटलं. शिवसेनेने लाचारी पत्करली आहे म्हणूनच शिवसेनेने काल सोनिया गांधी यांच्या नावाची शपथ घेतली. यापेक्षा लाचारी काय? आम्ही विरोधात बसण्याचा निर्णय घेतला आहे. असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता.

हे वाक्य मला असंख्य इंगळ्या डसल्यासारखं असल्याचं सांगितलं. आणि मग बोलताना मला राजकीय भाषेत ते मला करायचं नाही. मात्र, शिवसेना सोनियाजींची लाचारी करते आहे. ठीक आहे त्याच्यावरती बोलायचं असेल. कोणत्याही मैदानात बोलायला मी तयार आहे. मी डरणार नाही मी लढणार आहे. जे कधी मातोश्रीतून बाहेर पडले नाही. ते मातोश्रीतून बाहेर पडले. मातोश्रीमध्ये जे आले ते मातोश्रीमध्ये जाऊन खोटं बोलतायेत. मातोश्रीचा मान सन्मान जर तुमच्या मनामध्ये असेल तर या खोट्याची साथ मी कदापीही देणार नाही. कितीही दोनही पक्ष एकत्र झाले तरी सांगतो खोटेपणा माझ्या हिंदुत्वात नाही.

शिवसेना प्रमुखांनी मला शब्द देताना माघे फिरु नको हे शिकवलं आहे. गरज वाटेल तेव्हा शिवसेनेला मिठ्या मारायच्या. गरज सरो आणि वैद्य मरो, गरज संपल्यावर सोडून द्यायचं. असं म्हणत भाजपवर टीका केली.

Updated : 26 Nov 2019 3:41 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top