कसा होता आमदार धीरज देशमुख यांच्या पहिल्या अधिवेशनाचा अनुभव?

कॉग्रेसवर घराणेशाहीचा नेहमीच आरोप होतो. कॉंग्रेस नेहमी काही घराण्यांना सोबत घेऊन राजकारण करते. सर्वसामान्यांना संधी देत नाही. अशी चर्चा नेहमीच माध्यमांमध्ये सुरु असते. विधानसभेच्या निमित्ताने कॉग्रेसने ही परंपरा कायम ठेवली होती. कॉंग्रेसने पक्षाचे राष्ट्रीय सचिव व लातूर शहराचे आमदार अमित देशमुख(Dheeraj Deshmukh) यांच्यासह लातूर ग्रामीण मतदारसंघातून त्यांचे बंधू धीरज देशमुख यांना उमेदवारी दिली होती. आणि ते या निवडणूकीमध्ये विजयी होऊन विधानसभेत आले.

विधानसभेचा पहिलाच अनुभव असलेल्या धीरज देशमुख यांच्याशी आम्ही विधानसभेच पहिलं सत्र संपल्यानंतर विशेष बातचित केली.

यावेळी धीरज देशमुख यांनी राजकारणात येण्याचा निर्णय माझा नसून लातूरच्या जनतेचा होता. बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मोठे असल्याबाबत भाष्य केलं.