क्वारंटाईन व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या जेवणात अळी आणि माश्या, महापालिकेचा भोंगळ कारभार

1977

मुंबई महानगरपालिका गेल्या 3 महिन्यांपासून कोरोना रुग्णांचा उपचार करत आहे. त्यांना योग्य त्या सुविधा पुरवत आहे. ज्या रुग्णांना कोरोना झाला आहे. अशा लोकांच्या कुटुंबांना हाय रिस्क कॉन्टॅक्ट म्हणून 14 दिवसांसाठी क्वारंटाईन केलं जातं. त्या 14 दिवसांमध्ये त्यांना योग्य तो उपचार आणि योग्य ते जेवण दिलं जातं असं मुंबई महानगरपालिका सांगते.

मात्र, मुंबईतील चेंबूर M वेस्ट च्या पालिकेच्या क्वारंटाईन सेंटर मध्ये जेवणामध्ये अळ्या आणि माशी सापडल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे हे अन्न खाल्यानंतर लहान मुलांना उलट्या झाल्या. त्यामुळे त्या क्वारंटाईन सेंटर मधील लोक खूप घाबरलेले आहेत.

या संदर्भात मॅक्समहाराष्ट्रने तात्काळ या लोकांचं म्हणनं जाणून घेत सांबंधित अधिकाऱ्यांना या बाबत माहिती अवगत करुन दिली असता, वॉर्ड ऑफिसर पृथ्वीराज चव्हाण यांनी ज्यांनी कोणी ही चूक केली असेल त्यांच्यावर तात्काळ योग्य कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं आहे.

या संदर्भात मॅक्समहाराष्ट्र चे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांनी घटनास्थळी जाऊन घेतलेला आढावा.