Home > News Update > सफाई कामगाराचा मुलगा न्यायाधीश!

सफाई कामगाराचा मुलगा न्यायाधीश!

सफाई कामगाराचा मुलगा न्यायाधीश!
X

आई आणि वडील दोघेही सफाई कर्मचारी, सोलापूर मधील माता रमाबाई नगर सारख्या छोट्य़ाशा नगरातील रहिवाशी, पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेलं स्वप्न उराशी बाळगून त्याने कष्ठ केले. आई वडिलांच्या कष्ठाचं सोनं केलं न्यायाधीश झाला...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानून रात्रंदिवस अभ्यास केला. संकटांना भेदून, आर्थिक परिस्थितीवर मात करत, बुद्धी आणि सामर्थ्याच्या जोरावर एका सफाई कर्मचाऱ्याचा मुलगा न्यायाधीश झाला आहे. विशेष म्हणजे त्यांनी हे यश पहिल्याच प्रयत्नात मिळवत गरुड झेप घेतली आहे. कुणाल कुमार वाघमारे असं त्यांचे नाव आहे. लहानपणापासून न्यायाधीश व्हायचं हे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होतं. आज ते स्वप्न त्यानं साकार झालं आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने न्यायाधीश पदासाठी घेतलेल्या परीक्षांचा निकाल शनिवारी रात्री घोषित झाला. यात कुणाल वाघमारे २०० पैकी १५८ गुण मिळवत महाराष्ट्रातून दहाव्या क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले आहे. कुणाल यांची दिवाणी न्यायाधीश (क) स्तर व प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी म्हणून त्यांची निवड झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

हे ही वाचा...

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात 65 हजार कोटी रुपयांचा घोटाळा ?

माझा पुतळा जाळा… पण देशाची संपत्ती जाळू नका

आमदारांची नवी बॅच

कुणाल हे रमाबाई आंबेडकर नगर येथील रहिवासी. त्यांचे वडील कुमार आणि आई नंदा या सोलापूर महानगरपालिकेतील सफाई कामगार. आपल्या मुलाने न्यायाधीश व्हावे अशी त्यांची मनोमन इच्छा. त्यासाठी त्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली. मुलाला शिक्षणात कोणत्याच गोष्टी कमी पडू दिल्या नाहीत. त्यांच्या मुलानं देखील आई वडिलांच्या कष्टाचे चीज केलं. मुलाचे हे यश पाहून आज त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले.

कुणाल यांनी प्राथमिक शिक्षण सोलापूर महानगरपालिका शाळा क्रमांक २१ आणि शाळा क्रमांक २ तर महाविद्यालयीन शिक्षण दयानंद महाविद्यालय सोलापूर येथून पूर्ण केले. भाई चन्नुसिंह चंदेल महाविद्यालयातून एमएसडब्ल्यूची पदवी घेतली. त्यानंतर दयानंद विधी महाविद्यालयातून सन २०१४ एल.एल.बी. उत्तीर्ण होत, सोलापूर विद्यापीठातून प्रथम येऊन येण्याचा मान मिळवला. २०१६ साली एल.एल.एम. पूर्ण करत सोलापूर विद्यापीठात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०१८ साली दिवाणी न्यायाधीश (क) स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी या पदासाठी १९० जागांकरिता जाहिरात दिली. यासाठी ७ एप्रिल २०१९ ला पूर्व परीक्षा तर मुख्य परीक्षा १ सप्टेंबरला तर ६ डिसेंबरला मुलाखत झाली. अपार परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर कुणाल यांनी आपले ध्येय गाठण्यात यश मिळवले.

न्यायाधीशांना मिळणारा मानसन्मान आणि त्यांच्या प्रतिष्ठित हुद्द्यामुळेच बालपणापासूनच कुणाल यांना न्यायाधीश व्हायची प्रबळ इच्छा होती आणि अखेर ते साकारही झाली.

Updated : 23 Dec 2019 4:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top