Home > News Update > महिलांवरील अत्याचार थांबवावेत म्हणून अण्णा हजारेंचं 4 दिवसापासून मौन, एकही मंत्री फिरकला नाही....

महिलांवरील अत्याचार थांबवावेत म्हणून अण्णा हजारेंचं 4 दिवसापासून मौन, एकही मंत्री फिरकला नाही....

महिलांवरील अत्याचार थांबवावेत म्हणून अण्णा हजारेंचं 4 दिवसापासून मौन, एकही मंत्री फिरकला नाही....
X

निर्भया आरोपींना फाशीस उशीर झाल्यामुळं आणि देशातील वाढत्या महिला अत्याचारामुळं व्यथीत होत, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 20 डिसेंबर पासून राळेगणसिद्धी येथे मौन धारण केलं आहे. अण्णांनी गेल्या 9 डिसेंबर ला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि 10 डिसेंबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र पाठवून निर्भया प्रकरणातील गुन्हेगारांना त्वरित फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी व्हावी. अशी मागणी केली होती. अन्यथा आपण मौनव्रत धारण करू आणि पुढे जाऊन उपोषण आंदोलन करू असा इशारा दिला होता.

त्यानंतर 20 डिसेंबर पासून अण्णा हजारे यांनी मौनव्रत धारण केलं आहे. अण्णांनी काढलेल्य़ा प्रसिद्धपत्रकात अण्णा म्हणतात की, दिल्लीतील निर्भयाच्या आरोपींना फाशीची शिक्षा होऊन सात वर्षे उलटली तरी अजून शिक्षेची अंमलबजावणी झालेली नाही, देशात फास्टट्रॅक कोर्टात लाखो प्रकरणे पडून आहेत, न्याय आणि शिक्षेला उशीर होत असल्यानेच हैदराबाद एन्काऊंटरचे जनतेने स्वागत केले आहे. न्याय मिळण्यास उशीर होत असताना याबाबत सरकारची उदासीनता चिंतीत करणारी आहे. यासाठी सरकारने तातडीने पावलं उचलावीत.

दिल्ली निर्भया प्रकरण, पुण्यातील ज्योतिकुमार चौधरी बलात्कार प्रकरणातील फाशीची अंमलबजावणी न झाल्यानं गुन्हेगारांची रद्द झालेली फाशी, हैद्राबाद निर्भया प्रकरण आणि एन्काऊंटर आदी प्रकरणांचा दाखला देत न्यायाला आणि शिक्षेला होणारा उशीर नवीन गुन्ह्यांना प्रौत्साहित करणारा ठरत असल्याचं अणण्णांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

बलात्कार आणि हत्या प्रकरणात 2014 ला शेवटची फाशी झालेली आहे. त्यानंतर 426 प्रकरणात फाशीची शिक्षा होऊनही त्यांची अद्याप अंमलबजावणी नाही. फास्टट्रॅक कोर्टात सहा लाखाहून अधिक प्रकरणे आहेत, त्यातील अनेक प्रकरणं सहा-सात वर्षांपूर्वीची आहेत. निर्भया फंड महाराष्ट्रासह अनेक राज्यात उपयोगयाविना पडून आहे, हेल्पलाईन नंबर 1091 काम करत नाही, 2012 पासून ज्यूडीसीएल अकाऊंटबिलिटी बिल संसदेत पडून आहे. आदींवर अण्णांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान अण्णांच्या आंदोलनाला चार दिवस झाले आहेत. मात्र, अद्यापपर्यंत अण्णा केंद्र शासनाचा एकही मंत्री तिकडे फिरकलेला नाही. त्यामुळे अण्णा आता पुढे काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Updated : 24 Dec 2019 7:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top