निलम गोऱ्हे यांचा थक्क करणारा राजकीय प्रवास…

Courtesy: Social Media

महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांची पुन्हा एकदा विधान परिषदेच्या सदस्य पदी निवड झाली. महाराष्ट्राच्या तळागाळात जाऊन महिलांच्या प्रश्नांसाठी लढा देणाऱ्या नेत्या म्हणून त्यांची महाराष्ट्रात ओळख आहे. महिलांवर होणारे अत्याचारांवर त्यांची विधानपरिषदेतील भाषण अभ्यासपूर्ण आहेत. शिवसेनेत असलेल्या निलम गोऱ्हे यांचा स्वभाव शांत तितकाच आक्रमक देखील आहे.

आता त्यांच्यावर घटनात्मक जबाबदारी असताना ती ही जबाबदारी त्या कशा पार पाडतात? कोरोना नंतर सभागृह कसं चालणार? या सह आगामी काळात मार्गक्रमण करताना कोणती काळजी घ्यावी? या संदर्भात डॉ. अमोल देवळेकर यांनी उपसभापती निलम गोऱ्हे यांची घेतलेली विशेष मुलाखत नक्की पाहा