Top
Home > Max Political > उद्धव ठाकरे मुख्यमंत्री?

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री?

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री?
X

रात्री शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(udhav thackrey) यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Shard pawar) यांची भेट घेतली. यावेळी खासदार संजय राऊत,(Sanjay raut) यांच्यासह आमदार आदित्य ठाकरे (aaditya thackeray) देखील उपस्थित होते. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अजित पवार (Ajit Pawar)आणि सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. या भेटीनंतर खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकारांशी बातचित केली.

दरम्यान भाजपकडून शिवसेनेला मुख्यमंत्री पदाची ऑफर दिल्याच्या बातम्या येत आहेत. या संदर्भात बोलताना संजय राऊत यांनी आता कुणी इंद्राचं आसन दिलं तर ते आम्हाला नको, असं म्हणत भाजपकडून शिवसेनेला मुख्यमंत्री पद देण्याबाबतच्या चर्चेला पुर्णविराम दिला आहे. आपण मुख्यमंत्री होणार का? यावर बोलताना संजय राऊत यांनी

"मी शिवसैनिक म्हणून काम केलं आहे, सर्वांची इच्छा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावं असं मला वाटतं,"

असं म्हणत महासेना आघाडी चं मुख्यमंत्री पद उद्धव ठाकरे संभाळतील असे संकेत दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल परवा सोनिया गांधी यांची भेट घेतली. राज्यातील राजकीय घडामोडी संदर्भात ही भेट मह्त्वाची होती.

महाराष्ट्रात सध्या राष्ट्रपती राजवट आहे. त्यातच शिवसेना आणि भाजप या दोनही पक्षांनी एकत्र निवडणूका लढवूनही सत्ता स्थापन केलेली नाही. शिवसेनेने युतीमध्ये सत्तेचे समसमान वाटप हे सूत्र समोर ठेवलं होतं. या सुत्रानुसार मुख्यमंत्री पद देखील समान तत्त्वावर असावं. असं शिवसेनेचं म्हणणं होतं. त्यामुळं शिवसेनेनं भाजपशी राजकीय फारकत घेतली आहे.

आता शिवसेना, कॉंग्रेस- राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन करणार आहे. सत्ता स्थापन करण्या संदर्भात शिवसेना आणि कॉंग्रेस राष्ट्रवादीने ने कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार केला आहे. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका महत्वाची आहे.

त्यामुळं शरद पवार यांची उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. या भेटीनंतर संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी शेतकऱ्यांची इच्छा असल्याचं म्हटलं आहे.

Updated : 22 Nov 2019 6:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top