कोकणचा हापूस अखेर निघाला…

53

कोरोनामुळे लॉकडाऊनची स्थिती असताना कोकण रेल्वेच्या माध्यमातून कोकणासह दक्षिणेकडील राज्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जातोय. या करता कोकण रेल्वेच्या मार्गावर रो रो व मालगाडीच्या बरोबरच स्पेशल पार्सल ट्रेन चालवल्या जात आहे. याच स्पेशल पार्सल ट्रेनमधून रत्नगिरी चा हापूस आंबा अहमदाबाद येथे पाठवण्यात आला आहे.

कोरोनामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प असल्यानं आंबा व्यावसायिकांना आंबा राज्यात व राज्या बाहेर पाठवण्यात कोकण रेल्वे महत्त्वाची भूमिका बजावत आहे. रस्ते वाहतुकीपेक्षा निम्याहून कमी दरात आंब्याची वाहतूक कोकण रेल्वे च्या माध्यमातून होत आहे. 27 एप्रिल पासून कोकण रेल्वेच्या मार्गावर दुसरी पार्सल ट्रेन धावणार आहे.

दरम्यान आज केरळ मधून बनाना चिप्स कोकणात दाखल झाल्या. केरळ मधून आलेल्या या चिप्स कणकवली आणि रत्नागिरी स्थानकात उतरवल्या गेल्या. याचबरोबर उड्डापी येथून मडगाव येथे तीन टन माल उतरवला गेला. आणि याच गाडीत कोकणचा हापूस आब्बा गुजरातकडे रवाना झाला…