हिंदकेसरी: अबब! 27 लाखांचा बकरा…

राघुसारखी पिळदार आणि नऊ इंचाची नाकपुडी, आकाळ तब्बल सहा इंच, सहा फुटाचा पल्ला अशी शरीरयष्टी दररोज सकाळी एक लिटर आणि संध्याकाळी एक लिटर म्हशीचे दूध पिठाच्या गोळ्यातून काजू आणि बदामाचा खुराक. हे कोणत्या तालमीतील लाल मातीत भिजलेल्या पहिलवानाचे वर्णन नाही. हे वर्णन आहे कर्नाटक आणि महाराष्ट्रातील जत्रांमध्ये सरस ठरलेल्या सांगोल्यातील चांडोलवाडीतील मिटकरी मळ्यात असलेल्या बाबुराव मिटकरी यांच्या बकऱ्याचे.

ते याला महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील हिंदकेसरी समजतात. त्यांच्या या मेंढ्याला जत येथील प्रकाश मोटे यांनी सत्तावीस लाख रुपये किंमतीला मागितला पण एक कोटी दिले तरी हा बकरा मी देणार नाही अशी मी बिरोबाची शपथ घेतलीय असे ते सांगतात.

ते या बकऱ्याला त्यांचा मोदी आहे असे सांगतात “मोदी जसा सर्व इलेक्शन जिंकतो स्वतःची किंमत वाढवतो तसाच हा माझा बकरा आहे असे ते सांगतात.

बाबुराव मिटकरी यांचा पिढीजात मेंढपाळ हा व्यवसाय आहे. त्यांचा हा बकरा कर्नाटक येथील इंडी होडसन आटपाडी येथील जत्रांमध्ये सरस ठरला आहे. या बकऱ्याची ब्रिड असणाऱ्या पिल्लांना कर्नाटक तसेच महाराष्ट्रातून मोठी मागणी आहे. चार ते सहा महिन्याच्या पिल्लाची विक्री त्यांनी दोन ते दहा लाखापर्यंत केलेली आहे.

हा बकरा सांगोल्याची शान असल्याचे येथील नागरिक सांगतात. बाबुराव मिटकरी यांच्या वडिलांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्थलांतर करून मेंढ्या पोटच्या मुलाप्रमाणे जतन केल्या. भर पावसात चिखलात झाडाच्या फांद्या टाकून झोप घेतली.

हातावर भाकरी घेऊन खाल्ली या वडिलांनी केलेल्या कष्टाचे फळ मिळाले आहे असे ते सांगतात. सांगोल्यात असलेल्या या अनोख्या बकऱ्याची चर्चा आता महाराष्ट्रभर होऊ लागली आहे. याचे ब्रीड असलेल्या मेंढीच्या पोटात असलेल्या पिल्लाचा देखील व्यवहार होऊ लागल्याने या बकऱ्याला पाहण्यासाठी परिसरात कर्नाटक तसेच महाराष्ट्राच्या इतर ठिकाणचे लोक भेट देत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here