Home > Election 2020 > निवृत्त झाल्यानंतर पंतप्रधान मोदी काय करणार?

निवृत्त झाल्यानंतर पंतप्रधान मोदी काय करणार?

निवृत्त झाल्यानंतर पंतप्रधान मोदी काय करणार?
X

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अभिनेता अक्षय कुमारने मुलाखत घेतली. या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणा व्यतिरिक्त खासगी आयुष्यावर भाष्य केले. मोदींनी त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग या मुलाखती दरम्यान सांगितले. अक्षयने मोदींना या मुलाखतीत निवृत्तीनंतर तुमचा प्लॅन काय असेल असा प्रश्न विचारत बोलते करण्याचा प्रयत्न केला यावर मोदींनी त्यांच्या आयुष्यातील प्रसंग सांगत उत्तर दिलं.

‘मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. एकदा अटलजी, अडवाणीजी, प्रमोद महाजन यांच्यासोबत एक बैठक होती. या बैठकीत सर्वांत कमी वयाचा मीच होतो. बैठक सुरू होण्यापूर्वी सगळे मिळून सहज गप्पा मारत होतो, चर्चा करत होतो. निवृत्तीनंतर काय करणार याबाबत सगळेजण आपापले विचार सांगत होते. प्रमोदजींचं एक वैशिष्ट्य होतं, ते म्हणजे ते सतत लोकांशी स्वत:ला जोडून ठेवायचे. मला विचारलं तर मी म्हणालो, मला यातलं काही जमतंच नाही. मी कधी याबद्दल विचारच केला नाही. ज्या ज्या वेळी माझ्यावर जी काही जबाबदारी आली, त्यालाच मी आयुष्य मानलंय. स्वत:ला गुंतवून ठेवण्यासाठी काही करावं लागेल याची मी कल्पनाच केली नाही. म्हणूनच माझ्या मनात कधी निवृत्तीविषयी विचार आला किंवा मी कधी त्याबद्दल विचारच करत नाही. पण आयुष्याचा प्रत्येक क्षण कोणत्या ना कोणत्या सदकार्यातच घालवेन यावर मला पूर्ण विश्वास आहे,’ असं मोदींनी सांगितलं.

Updated : 24 April 2019 6:04 AM GMT
Next Story
Share it
Top