Home > News Update > अशी रंगणार निवडणुक बारामतीची...

अशी रंगणार निवडणुक बारामतीची...

अशी रंगणार निवडणुक बारामतीची...
X

बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघाचा आपण आढावा घेणार आहोत. आपल्या सोबत आहेत माजी आय.पी.एस.अधिकारी सुरेश खोपडे यांच्याकडुन आपण जाणून घेऊ बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये असणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे?

बारामती मतदारसंघांमध्ये अजित पवार आणि गोपीचंद पडळकर यांचे मध्ये सामना होणार आहे. अजित पवार नक्कीच यशस्वी होतील त्यांचा घराघरांमध्ये असलेला संपर्क आणि भावी मुख्यमंत्री म्हणून बारामतीतील लोक त्यांच्याकडे पाहतात.

इंदापुरमध्ये हर्षवर्धन पाटील यांचेही नाव चांगलं आहे अलीकडे त्यांनी जे पक्षांतर केलं ते लोकांना पटलं नाही. हर्षवर्धन पाटील जरी चांगले कार्यकर्ते, चांगलं काम करणारे असले तरी त्यांना पक्ष बदलण्याचे सबळ कारण त्याना देता आले नाही. नंतरच्या काही दिवसांत ते नॉटरिचेबल होते आणि त्यांनी अशी हवा निर्माण केली की त्यांच्यावर अन्याय होत आहे. जनता त्यावरती विश्वास ठेवायला तयार नाही. इंदापूर मधून दत्ता भरणे यांना चांगली संधी आहे.

पुढचा मतदारसंघ दौंड सुभाष कुल यांचा मुलगा राहुल कुल काम करणारा कार्यक्षम आमदार निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे. कारखान्यात त्यांची कामगिरी म्हणावे अशी समाधानकारक नाही. असं कारखान्यांच्या सभासदांमध्ये बोलले जातेय. त्यांच्याविरूद्ध असलेले रमेश आप्पा थोरात हे जुने जाणते कार्यकर्ते असुन त्यांचा जनसंपर्क मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या मागे शरद पवारांची साथ आहे. त्यामुळे तेथे राष्ट्रवादीचं पारडे जड आहे.

२०१४ साली जी आमची लढत झाली. त्या वेळेस सगळे लोक बोलायचे जानकर हे निस्वार्थी कार्य करणारा सच्चा कार्यकर्ता आहे. सत्याची बाजू घेणारा आहे परंतु नंतरच्या पाच वर्षाच्या काळामध्ये लक्षात आलं की त्यांनी देखील डावं-उजवं केलेलं आहे आणि सगळा पक्ष जातीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केल्यामुळे ते पुन्हा बाजूला पडले. पुन्हा धनगरांची दिशाभूल झाली असा समज नेत्यांचा देखील झाला. यामुळे पूर्वीइतकं वजन राहिलं नाही असं बोलल जातय.

पुरंदर मध्ये विजय शिवतारे यांचं काम देखील मंत्री म्हणून चांगल्या प्रतीचं होतं परंतु अलीकडे त्यांना तब्येतीनं साथ न दिल्यामुळे उर्मी कमी झालेली आहे . त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे लोक नाराज झालेले आहेत. पूर्वी सोबत असलेला वर्ग त्यांच्या विरोधात आहे. त्याच बरोबर बीजेपीचे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर काम करायला तयार नाहीत.

संजय जगताप यांना देखील राजकीय वारसा आहे.परंतु त्यांना मागच्या वेळेला ज्या ठिकाणी कमी मतं मिळाली होती त्या जागेवर देखील त्यांनी आपलं लक्ष केंद्रित केलेला आहे. सोबतच राष्ट्रवादीने जागा खूप प्रतिष्ठेची केलेली आहे. अजित पवारांसोबतच्या भांडणाला व्यक्तिगत स्वरूप आले आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवतारेचा पराभव करायचा असं अजित पवारांनी ठरवलंय.

भोर-वेल्हा-मुळशी मध्ये 2014 साली मोदींची लाट असूनही तिथली विधानसभा ही काँग्रेसने राखली होती. संग्राम थोपटे यांचा विजय झाला होता .

आता संग्राम विरोधात तिथे शिवसेनेचे कुलदिप कोंडे आहेत. अनंतराव थोपटे हे कार्यकुशल तसेच एक चांगले प्रशासक होते आणि त्यांनी तो मतदार संघ खूप मजबूत बांधलेला आहे. पुढे त्यांचे चिरंजीव संग्राम थोपटे हा मतदार चालवत आहेत.

खडकवासला मतदार संघामध्ये आजची लढत विद्यमान आमदार भीमराव तापकीर विरुद्ध सचिन दोडके अशी आहे . एकंदरीत पाहिलं तर यावेळेस गेल्या वेळेपेक्षा चांगलं मताधिक्य सुप्रिया सुळे यांना मिळालं आहे. सलग दोन वेळा भिमराव तापकीर निवडून आलेले आहेत आणि त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. त्यापेक्षा शहरी मतदार संघ या वेळेस मोदीजींनी सर्जिकल स्ट्राइक असेल किंवा काश्मीर बद्दल घेतलेले काही निर्णय असतील याचा परिणाम शहरी मतदारांवर ती होत असतो.

https://youtu.be/U5DdCLCBLb8

Updated : 16 Oct 2019 6:11 PM GMT
Next Story
Share it
Top