आर्थिक पॅकेज नाही, हा तर शेतकऱ्यांशी सरकारने केलेला आकड्यांचा खेळ: विजय जावंधिया

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी कोविड-१९ (COVID-19) च्या पार्श्वभूमीवर केलेल्या घोषणात ६ हजार ७०० कोटी रुपये त्यांनी एमएसपी ऑपरेशनला दिले आहेत. यात देशभरातील गहू, धान, हरभरा, कापूस, तूर, सरसो याची खरेदी कशी होऊ शकते? तसेच ३ कोटी शेतकऱ्यांना कर्ज दिल्याची बतावणी ही जुनी असून ती दरवर्षी मिळते. २५ लाख शेतकऱ्यांना नवीन किसान क्रेडिट कार्ड दिलं जाणार आहेत.

त्यासाठी २५ हजार कोटींच कर्ज आहे मग नवीन काय आहे. ९ कोटी शेतकऱ्यांना १८ हजार कोटी दिलेले असून मोदी सरकार नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांशी आकड्यांचा खेळ खेळत आहे शेतकऱ्यांच्या पदरात हमीभाव सुद्धा पडत नाही ही शोकांतिका असल्याचे ज्येष्ठ शेतकरी विजय जावंधिया यांनी म्हटलं आहे. कोविड-१९ च्या जागतिक मंदीमध्ये हा शेतकरी शेतमाल उपलब्ध करत आहे त्याला बाजारपेठही मिळत नाही.

फळ, भाजी, फुलं त्याला नांगरुण टाकावी लागत आहे. मोदी सरकारने या वर्षी थकित कर्जदारांना जुना-नवीन पीक कर्ज द्या आणि शेतकऱ्याच्या शेतातलं या वर्षी पेरणी पासून ते कापणी पर्यंतचं काम रोजगार हमी योजनेतून करुन देण्याची घोषणा करा. तसेच पुढच्या वर्षी सगळ्या शेतमालाला हमी किंमतीत घेतला जाईल याची व्यवस्था करा अशी मागणी विजय जावंधिया यांनी केली आहे. पाहा हा व्हिडिओ…