माय बाप सरकार, आम्हालाही विमा कवच द्या: एसटी कर्मचाऱ्यांची मागणी

कोरोना व्हायरसच्या लढाईत डॉक्टर,पोलिस, पत्रकार, भाजीपाला विक्रेते, बस चालक, वाहक अत्यावश्यक सेवा देण्यात कुठलीही कमतरता ठेवत नाही. यातील अनेकांना कोरोनाची लागण ही झाली. तरीही कोरोनाच्या लढाईत त्यांच्या योगदानात तसूभरही घट झालेली नाही. किंबहून ती यापुढे ही होणार नाही. मात्र, त्यांना एकाच गोष्टीची चिंता सतावत आहे. ती म्हणजे आपल्या घरादाराची.

वाहन चालक शहादेव डोळस मुंबईत एसटी चालवण्याचे काम करतात. सध्या मुंबई आणि मुंबई परिसरात देशातील सर्वाधिक कोरोना चे रुग्ण आहेत. तरीही ती न भिता अत्यावश्यक सुविधा देणाऱ्या सर्वांची ने आण करत असतात. मात्र, त्यांना त्यांच्या मुला बाळाच्या भविष्याची चिंता आता सतावत आहे. अत्यावश्यक सेवेत काम करताना त्यांनी काही मागण्या मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना व्यक्त केल्या आहेत.

सरकारने अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्वांना समान न्याय देण्याची मागणी शहादेव डोळस यांनी सरकारकडे केली आहे…

काय आहेत मागण्या?

1)कोरोना सारख्या महामारीमध्ये आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांना ५० लाखांचा विमा दिला. त्य़ाप्रमाणे अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना राज्य परिवहन महामंडळाच्या चालक/वाहक/यांञीक/वा.नियञंक यांनाही ५० लाखाचा सुरक्षा विमा लागू करा.

२) कोरोना सारख्या महामारी आजारामध्ये ज्या रा.प चालक/वाहक/यांञीक/वा.नियञंक यांनी अत्यावश्यक सेवेमध्ये काम केले त्यांना २ वेतन द्यावे.

३) अत्यावश्यक सेवेत काम केलेल्या रा.प चालक/वाहक/यांञीक/वा.नियञंक यांनी जितके दिवस काम केले तितक्या रजा त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करा.

४) कोरोना सारख्या महामारीमध्ये कुटुबांपासुन दुर राहुन अत्यावश्यक सेवेत काम केलेल्या रा.प चालक/वाहक/यांञीक/वा.नियञंक यांना १५ आॕगस्ट रोजी खास विशेष गौरव पुरस्कार व प्रशस्ती पञ तसेच त्यांना पदोन्नती (बढती) देऊन सन्मानीत करा.

५) हँन्ड ग्लोज/sanitizer व मास्क चांगल्या दर्जाचे द्यावे. या मागण्या मांडल्या आहेत.