Home > News Update > राज्यमंत्री महातेकर म्हणतात, मालाड दुर्घटनेत संरक्षण द्यायचं राहून गेलं

राज्यमंत्री महातेकर म्हणतात, मालाड दुर्घटनेत संरक्षण द्यायचं राहून गेलं

राज्यमंत्री महातेकर म्हणतात, मालाड दुर्घटनेत संरक्षण द्यायचं राहून गेलं
X

मालाड दुर्घटनेत २२ जणांचा दुर्देवी मृत्यु झालाय तर ७८ जण जखमी झाले आहेत. अशा परिस्थितीत सरकार हा अपघात, आपत्ती असल्याचं म्हणतंय. राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी मात्र मालाड दुर्घटनेत संरक्षण द्यायचं राहून गेल्यानं ही दुर्घटना घडल्याची कबुलीच दिलीय.

मालाडमधील आंबेडकर नगर, पिंपरीपाडा या दुर्घटनाग्रस्त भागांना महातेकर यांनी भेट दिली. त्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते. यावेळी दुर्घटना घडल्याशिवाय चौकशी करू असं सगळ्यांकडून सांगितलं जात आहे, मात्र एखादी दुर्घटना होईपर्यंत, मृत्यु होईपर्यंत याची वाट का पाहावी लागते, असा प्रश्न विचारला. त्यावर सामाजिक न्याय राज्यमंत्री महातेकर म्हणाले की, ‘’एवढी प्रचंड मोठी मुंबई आहे घटना घडल्याशिवाय थोडीच काय कळणार आहे. आज सगळीकडे करोडो रूपयांचा खर्च करून ज्या-ज्या ठिकाणी आपण संरक्षण देण्याचा प्रयत्न करतो आणि एखादं जे राहून जातं त्या ठिकाणी अशी घटना घडून जाते, असं उत्तर दिलं. त्यामुळं मालाडच्या ज्या भागात ही घटना घडली तिथं सरकारकडून संरक्षण द्यायचं राहून गेल्याची स्पष्ट कबुलीच राज्यमंत्री महातेकर यांनी दिलीय. खालील व्हिडिओमध्ये ऐका महातेकर काय म्हणाले ते.

Updated : 3 July 2019 4:48 PM GMT
Next Story
Share it
Top