Home > मॅक्स व्हिडीओ > 'अपबीट' राष्ट्रवाद की बंधुभाव जोपासणारा राष्ट्रवाद?

'अपबीट' राष्ट्रवाद की बंधुभाव जोपासणारा राष्ट्रवाद?

अपबीट राष्ट्रवाद की बंधुभाव जोपासणारा राष्ट्रवाद?
X

करोनाच्या संक्रमणामुळे देश लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनमुळे स्थालंतरित मजूर आणि गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे. हातातला रोजगार गेल्यामुळे खायचं काय असा प्रश्न या मजूरांसमोर असल्यामुळे त्यांनी आपल्या घरचा रस्ता पायीचं पार पाडायचा ठरवलं आणि निघाले. देशात लॉकडाऊन असूनही या मजुरांनी कोणत्याही साधनाची वाट न बघता तसेच करोना व्हायरसलाही न घाबरता पायपीट करत आपल्या गावी निघालेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात या स्थलांतरीत मजुरांबद्दल सहानुभूतीचे दोन शब्द देखील का बरे बोलले नसावेत? भारतीय राजकारणातील सर्वात चाणाक्ष नेता असे करत असेल तर त्यामागे निश्चित कारणे असणार. त्या कारणांचा अर्थविश्लेषक मिलिंद मुरुगकर यांनी घेतलेला हा शोध.. पाहा हा व्हिडिओ...

Updated : 15 May 2020 2:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top