Home > मॅक्स व्हिडीओ > टीव्ही शो, चित्रपटांच्या शुटींग ला परवानगी मिळते, लोक कलावंताना का नाही?

टीव्ही शो, चित्रपटांच्या शुटींग ला परवानगी मिळते, लोक कलावंताना का नाही?

टीव्ही शो, चित्रपटांच्या शुटींग ला परवानगी मिळते, लोक कलावंताना का नाही?
X

यावेळी त्यांनी सध्याच्या घडीला अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्यानं वेगळी काम करायला सुरुवात केली आहे. असं सांगितलं. मात्र, गेल्या कित्येक वर्ष समाजात कलाकार म्हणून काम केल्यानंतर दुसरं काम कसं करणार? या आम्हाला आता दुसरीकडे काम कसं मिळणार?

असा सवाल केला आहे.

त्यातच गणपती उत्सव हा लोककलावंताचा सिझन असतो. मात्र, सध्याच्या घडामोडी ला सरकारने या सर्व कार्यक्रमावर बंदी घातल्याने या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्यातील दुकानं सुरु झाले आहेत. टीव्ही वरील अनेक शोचे शुटींग सुरु झाले आहे. चित्रपटाचे देखील शुटींग सुरु झाले आहे.

मात्र, कलावंताच्या कार्यक्रमाला सरकारने अद्यापपर्यंत परवानगी मिळालेली नाही. त्यामुळं या कलाकारांनी इतर कार्यक्रमांप्रमाणे लोक कलावंताच्या कार्यक्रमाला परवानगी द्यावी. अशी विनंती या कलाकारांना केली आहे.

Updated : 19 Aug 2020 10:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top