Home > मॅक्स व्हिडीओ > Video: महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर फेकल्या कडकनाथ कोंबड्या

Video: महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर फेकल्या कडकनाथ कोंबड्या

Video: महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर फेकल्या कडकनाथ कोंबड्या
X

महाजनादेश यात्रेच्या मार्गात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर कुंडल फाटा येथे कडकनाथ कोंबडी घोटाळ्याचा विरोध दर्शवण्यासाठी चक्क कडकनाथ कोंबड्या फेकण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना आपला विरोध दर्शवण्यासाठी हे आंदोलन केले असुन आंदोलना दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली आहे.

स्वाभिमानीचे कार्यकर्ते पलूस तासगाव मार्गावरून मुख्यमंत्र्यांचा ताफा जाणार होता म्हणुन आधीपासुनच दबा धरून बसले होते. मुख्यमंत्र्यांची बस दिसताच त्यांनी कोंबड्या फेकल्या. हजारो शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. कडकनाथ कोंबडी घोटाळ्याची चौकशी व्हावी अशी या कार्यकर्त्यांची मागणी होती.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/523611645084089/?t=0

Updated : 16 Sep 2019 10:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top