Home > मॅक्स व्हिडीओ > रावेर हत्याकांड: अल्पवयीन मुलीवर अत्याचार, हत्याकांडाचं गूढ कायम

रावेर हत्याकांड: अल्पवयीन मुलीवर अत्याचार, हत्याकांडाचं गूढ कायम

रावेर हत्याकांड: अल्पवयीन मुलीवर अत्याचार, हत्याकांडाचं गूढ कायम, अनेक प्रश्नांची उत्तर गुलदस्त्यातच

रावेर हत्याकांड: अल्पवयीन मुलीवर अत्याचार, हत्याकांडाचं गूढ कायम
X

Courtesy -Social media

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील हत्याकांडात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे अखेर स्पष्ट झाले आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी रविवारी रात्री पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. या हत्याकांडाच्या गुन्ह्यात परिस्थितीजन्य पुरावे तसेच घटनेच्या प्राथमिक तपासात समोर आलेल्या काही बाबींच्या आधारे अज्ञात आरोपींविरुद्ध अत्याचाराचे कलम लावल्याची माहिती देखील दिली. मात्र, या गुन्ह्याशी निगडित अनेक गूढ तसेच बाबींविषयी पोलिसांनी माहिती देणे टाळले. त्यामुळे सद्यस्थितीत पोलिसांनी किती संशयितांना ताब्यात घेतले आहे, काय पुरावे मिळाले आहेत, तपास कोणत्या दिशेने चालला आहे, हे गुलदस्त्यातच आहे.

बोरखेडा शेतशिवारात 16 ऑक्टोबर रोजी चार मुलांची अज्ञात व्यक्तींनी कुऱ्हाडीने वार करत अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर शेतमालकाच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर तीन दिवसांपासून पोलिसांचा तपास सुरूच आहे. पोलिसांनी काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या हत्याकांडात 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा संशय होता. त्या अनुषंगाने अनेक चर्चा सुरू होत्या, तर्कवितर्क लढवले जात होते.

त्यामुळे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर, पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी रावेर पोलीस ठाण्यात संयुक्तपणे पत्रकार परिषद घेत घटनेबाबत काही बाबी स्पष्ट केल्या. रावेर हत्याकांड: अल्पवयीन मुलीवर अत्याचार, हत्याकांडाचं गूढ कायम गुन्ह्यात वाढवले अत्याचाराचे कलम यावेळी माहिती देताना पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर म्हणाले की, हा गुन्हा अत्यंत संवेदनशील आहे. या गुन्ह्याच्या तपासात कोणत्याही प्रकारची चूक राहू नये, तपासाचा टप्पा चुकायला नको म्हणून आम्ही खूप काळजी घेत आहोत.

आत्तापर्यंतच्या तपासात जे वैज्ञानिक आणि तांत्रिक पुरावे समोर आले आहेत; याशिवाय संशयितांच्या चौकशीत जी माहिती समोर आली आहे, त्याची खातरजमा केल्यानंतर या घटनेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा निष्कर्ष आम्ही काढला. त्यामुळे खुनाच्या गुन्ह्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध भादंवि कलम 376 (ए), 452, लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4, 6, 8, 10, 12 अन्वये वाढ केली आहे. असे डॉ. दिघावकर यांनी सांगितले. परंतु, पीडितेवर सामूहिक अत्याचार झाला आहे किंवा नाही, याची माहिती आत्ताच देता येणार नाही, असे सांगत त्यांनी अधिक बोलणे टाळले. या हत्याकांडाच्या गुन्ह्यात अत्याचाराचे कलम आल्याने आता पीडितेवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट होत आहे.

चार दिवस उलटून अहवाल नाही फॉरेन्सिक लॅबकडून कोणतेही अहवाल प्राप्त झालेले नाहीत. मृतांच्या शवविच्छेदनाचा सविस्तर अहवाल देखील बाकी आहे. शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. त्यात फक्त मृत्यूचे कारण समजले आहे. पोलिस तपासात जे पुरावे हाती लागले आहेत; त्यांचे विश्लेषण करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने काही बाबींची माहिती जाहीर केली जाईल. या प्रकरणात अजूनपर्यंत कोणालाही अटक केलेली नाही. जे ताब्यात घेतले आहेत, ते संशयित आहेत. त्यात काही संशयित अल्पवयीन आहेत.

संशयित तीन आरोपींमध्ये पीडित मुलीच्या भावाच्या मित्रांचा समावेश आहे. तेही अल्पवयीन आहेत. दरम्यान घटनेच्या तीन दिवस उलटल्यानंतर पोलिसांनी जाहीर पत्रकार परिषेदेत माहिती दिली, मात्र अनेक प्रश्न अनुत्तरीतच आहेत.


Updated : 19 Oct 2020 3:10 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top