Home > मॅक्स व्हिडीओ > “परीक्षार्थींना कोरोनाची लागण झाल्यास राज्यपाल जबाबदारी स्वीकारणार का?”

“परीक्षार्थींना कोरोनाची लागण झाल्यास राज्यपाल जबाबदारी स्वीकारणार का?”

“परीक्षार्थींना कोरोनाची लागण झाल्यास राज्यपाल जबाबदारी स्वीकारणार का?”
X

कोरोनाच्या संकटामुळे रखडलेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षा लवकरात लवकर घेण्यात याव्यात अशी सूचना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी युजीसीला पत्र लिहून अंतिम वर्षाच्या परीक्षाही रद्द करण्याची मागणी केली होती.

त्यावर तीव्र आक्षेप घेत राज्यपालांनी सामंत यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तसंच मुख्यमंत्र्यांनी त्यांना समज द्यावी असेही पत्रात म्हटले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पुणे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सरचिटणीस सुनिल तळोकार यांनी राज्यपालांना पत्र लिहिलं आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या आणि परीक्षेला आलेल्या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली तर त्याच जबाबदारी राज्यपाल स्वीकारणार का असा सवाल या पत्रात विचारण्यात आला आहे.

राज्यातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी मुंबई आणि पुण्यात येत असतात. आता ही दोन्ही शहरं कोरोनाची हॉटस्पॉट ठरली आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी गावी गेले आहेत. त्यांना परीक्षेसाठी पुन्हा या शहरांमध्ये यावे लागेल. त्यामुळे गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. तसंच परीक्षेत विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्यास राज्यापाल त्याची जबाबदारी स्वीकारणार का, असा सवालही विचारण्यात आला आहे. आता या परीक्षा रद्द करण्यासाठी राज्यपालांनीच केंद्र सरकार आणि युजीसीकडे पाठपुरावा करावा अशी मागणीही सुनील तळोकार यांनी केली आहे.

Updated : 23 May 2020 12:25 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top