Home > News Update > मी येशु ख्रिस्त यांच्याकड़ून ज्ञानदेव-तुकाराम महाराज यांच्याकडे आलो आहे, ही सर्व मला येशुची भावंडं वाटतात - फादर फ्रांसिस दिब्रेटो

मी येशु ख्रिस्त यांच्याकड़ून ज्ञानदेव-तुकाराम महाराज यांच्याकडे आलो आहे, ही सर्व मला येशुची भावंडं वाटतात - फादर फ्रांसिस दिब्रेटो

मी येशु ख्रिस्त यांच्याकड़ून ज्ञानदेव-तुकाराम महाराज यांच्याकडे आलो आहे, ही सर्व मला येशुची भावंडं वाटतात - फादर फ्रांसिस दिब्रेटो
X

उस्मानाबाद येथे होणाऱ्या 93 व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड करण्यात आली आहे. हे अधिवेशन 11, 12, 13 जानेवारी रोजी होत आहे. या संमेलनासाठी सर्वानुमते फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांची अध्यक्ष पदी निवड करण्यात आल्यानंतर अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या.

या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार किरण सोनवणे यांनी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची घेतलली मुलाखत ‘साहित्य हे समाजाला सत्याचे भान देवून भविष्याचे वेध घेण्याची दृष्टी देणारा संस्कार आहे. त्यामुळे साहित्य आणि साहित्यिकाला प्रत्येक समाजात एक आदरणीय स्थान आहे. मराठी साहित्याच्या संदर्भात जर बोलायचे झाले तर महींभट्टच्या लीळा चरित्रापासून सुरू झालेला हा प्रवास अनेक संक्रमणातून जात, आजच्या आधुनिक मराठी भाषेपर्यंत येऊन ठेपला आहे.

या भाषेच्या साहित्य उत्सवाची सुरुवात न्यायमूर्ती रानडे यांनी स्वातंत्रपूर्व काळात 93 वर्षा पूर्वी केली. त्यापूर्वी साहित्य सभा जरी होत नसल्या तरी विविध धर्म, त्यांचे पंथ उपपंथ यांच्या धर्म संवाद सभा मात्र होत असत. या 93 वर्षाच्या काळात या साहित्य उत्सवाने अनेक परिवर्तन पाहिली. विशेष म्हणजे सुरुवातीलाच अशा या साहित्य मेळ्याला कडाडून विरोध केला तो म्हणजे क्रांतीबा ज्योतिराव फुले यांनी.

हे ही वाचा

महात्मा ज्योतीराव फुले यांनी महाजन वर्गाच्या साहित्यिकांची परंपरा नाकारत थेट शोषित-पीडित बहुजन वर्गाच्या दुःख, दारिद्र्य मांडणारा वेगळा साहित्यिक विचार त्यांनी मांडला. त्यामुळे आज महाराष्ट्रात शाहू-फुले, आंबेडकर, विद्रोही, दलित, शेतकरी, शिक्षक, पुरोगामी, बौद्ध, ग्रामीण, वऱ्हाडी, आदिवासी असे अनेक प्रकारची साहित्य संमेलन होत असतात.

प्रत्येक साहित्य संमेलनाच्या वेळी काहींना काही वाद होतोच, त्याला हे संमेलन सुद्धा अपवाद नाही.

फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांच्या निवडी वरून येथील सनातनी हिंदू संघटनांनी विरोध केला असून, जर सावरकरवादी, शेषराव मोरे, आनंद साधले यांच्या नावाला जर साहित्य वर्तुळात ते एका विचाराचे समर्थन करतात. म्हणून जर विरोध होत असेल, तर कॅथलिक धर्मगुरू तुम्हाला साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून कसा काय चालतो? अशी मांडणी करत विश्व हिंदू परिषद आणि इतर सनातनी संघटनांनी फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांच्या निवडीला विरोध केला होता. काही मंडळींनी तर संमेलन उधळून लावण्यापर्यंतच्या धमक्या दिल्या आहेत.

यासर्व पार्श्वभूमीवर मॅक्स महाराष्ट्र ने फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांच्याशी संवाद साधला ठरवले. आम्ही त्यांच्याशी बातचित करण्यासाठी गिरीज याठिकाणी असणाऱ्या जीवन संवर्धन केंद्र अर्थात कॅथलिक ख्रिस्ती धर्म संस्थेच्या केंद्रात जाऊन पोहचलो.

फादर फ्रान्सिस दिब्रेटो अंतर बाह्य अतिशय शालीन, संवेदनशील आणि मायाळू असे व्यक्तीमत्व. त्यांनी हसत मुखाने स्वागत केलं. चहा-पानं झाल्यावर मुलाखत, त्याचे स्वरूप, मॅक्समहाराष्ट्र काय आहे याची कल्पना दिली. आणि मग रितसर मुलाखतीला सुरुवात झाली.

फ्रान्सिस दिब्रेटो यांची आता पर्यंत एकूण 19 पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. त्यात 4 ललित लेखन, प्रवास वर्णन, अनुवाद आणि वृत्तपत्रात केलेले स्तंभ लेखन याचा समावेश आहे.

मुलाखतीत एकूण सामान्य वाचक, लेखक, विरोधक आणि सर्वसामान्य व्यक्ती यांना पडणारे बहुतांशी प्रश्न मॅक्समहाराष्ट्र ने विचारले आहेत. मुलाखती मागे फ्रान्सिस दिब्रेटो यांची मतं जाणून घेण्याचा हेतू असल्याने, त्यांनी काही वेगळी विधाने किंवा विवादास्पद विधानं केली आहेत, त्याचा फार प्रतिवाद करण्यात आलेला नाही.

त्यात ते कॅथलिक धर्मगुरू आहेत, त्यांच्या जीवन आणि जगण्याची चौकट आहेत. त्या चौकटीतुन ते बोलतात, त्यांना ती चौकट मोडावीशी वाटत नाही, किंवा त्यात त्यांना सुरक्षितता वाटते. ती सांभाळून त्यांना जे साहित्य सृजन करता आले, लोक लढ्यात सहभागी होता आले, किंवा त्यांनी भारतीय संस्कृतीतील संत, विचारक किंवा समाजसेवक यांच्यातच ख्रिस्ती धर्मातील विचारांची मूल्ये पाहिली आणि ते त्यांच्या प्रेमात पडल्याचे दिसते.

फादर दिब्रेटो एका ठिकाणी म्हणतात ‘श्री रेवरन्ट यांचा प्रवास कडून येशू ख्रिस्ताकडे झाला, तर माझा हा येशू ख्रिस्ताकडून ज्ञानदेव-तुकाराम असा झाला.

ते एका हातात संविधान व दुसऱ्या हातात आपल्या धर्माचे पुस्तक असा प्रवास करण्याचे सांगतात. त्यावेळी धर्माचे पुस्तक हा एक कायदा आणि संविधान हा एक कायदा असे दोन कायद्याचा ते पुरस्कार करताना दिसतात. साहित्य, अभिव्यक्ती स्वतंत्र, मराठी भाषा अश्या अनेक मुद्दयावर फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांनी आपली मते मांडली आहेत

सर्वात वेगळी गोष्ट फ्रान्सिस दिब्रेटो यांनी जर केली असेल, तर त्यांनी त्यांच्या धर्मगुरू, साहित्यिक आणि एक प्रभावशाली व्यक्तिमत्व असल्याचा अचूक वापर करीत त्यांनी वसई येथे त्यांचा जो सत्कार झाला तिथे त्यांनी समाजातील दानशूर व्यक्तींना आवाहन केले आहे की, माझ्या स्वागतासाठी हार फुले, पुस्तक, भेट वस्तू आणण्याऐवजी पैसे दान म्हणून द्या. यासाठी एक समिती दाखल केली असून त्यात आता पर्यंत लाखो रुपये जमा झाले आहेत. हा आकडा 10 लाखा पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

या दहा लाख रुपयांची मदत उस्मानाबाद येथे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला ती उस्मानाबाद चे जे जिल्हाधिकारी आहेत. त्यांच्या मदतीने एका स्वयंसेवी संस्थेमार्फत दिली जाणार आहे.

ही मुलाखत तुम्ही मुळातून ऎका आणि तुमची जी काही बरी-वाईट मते असतील ती मुक्त आणि आपण सभ्य भाषेत नोंदवा.

Updated : 11 Dec 2019 11:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top