बियाणं बोगस असणं म्हणजे काय?

लॉकडाऊनच्या काळात जेव्हा सगळे जग घरात बसले होते, तेव्हा फक्त शेतकरी राजा शेतामध्ये राबत होता. पण या शेतकऱ्यावर जेव्हा आता संकट आलेले आहे तेव्हा त्याच्या मदतीला सरकार अजूनही आलेले नाही अशी खंत जेष्ठ कृषीतज्ञ बुधाजीराव मुळीक यांनी व्यक्त केलेली आहे. राज्यात सध्या सोयाबीनच्या बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आलेले आहे. पण ही दुबार पेरणी शेतकऱ्यांना खरंच फायद्याची ठरणार आहे का असा प्रश्न देखील आता उपस्थित झालेला आहे.

शेतकऱ्यांवर जेव्हा नैसर्गिक संकट येतं तेव्हा संकटात त्यांना होणारे नुकसान भरून देण्यासाठी अजून कोणताही कायदा नाहीये त्यामुळे सरकारने आता तातडीने अध्यादेश काढण्याची मागणी बुधाजीराव मुळीक यांनी केलेली आहे. त्याचबरोबर जेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या बियाण्याच्या जाती तयार केल्या जातात,.त्याबाबत नेमकी काय खबरदारी घेतली पाहिजे, कायद्यात याबाबतची कोणती तरतूद असली पाहिजे याचे संपूर्ण विश्लेषण हे बुधाजीराव मुळीक यांनी केलेले आहे. बुधाजीराव मुळीक यांचे हे विश्लेषण पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

-बुधाजीराव मुळीक, ज्येष्ठ कृषितज्ज्ञ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here