Top
Home > Fact Check > Fact Check: मुलं चोरणारी टोळी सक्रीय?

Fact Check: मुलं चोरणारी टोळी सक्रीय?

Fact Check: मुलं चोरणारी टोळी सक्रीय?
X

लहान मुलं चोरणारी टोळी सक्रीय आहे. लहान मुलांचे अवयव विकून त्याचा व्यवसाय करणारे लहान मुलांची चोरी करणारे ठिकठिकाणी पकडले जातायत, त्यांचे व्हिडीयो व्हायरल होतायत. तुमच्यापर्यंत ही असे व्हिडीयो आले असतील. त्यातले हे काही पॉप्युरल व्हिडीयो तुमच्या इनबॉक्स मध्ये एव्हाना दाखल झाले असतील.

आपल्या पाल्याच्या, आसपासच्या लहान मुलांच्या काळजीपोटी तुम्ही हे व्हिडीयो व्हायरल करायला निघाला असाल तर सावधान. थोडं थांबा, आता या व्हिडीयोंची सत्यता पडताळून बघूया. सध्या व्हायरल असलेल्या या बातम्यांमध्ये काहीही तत्थ्य आढळून आलेले नाही.

महिलेचे कपडे घालून बसलेल्या एका मनोरूग्ण मुलाला मारून मुलं चोरणाऱ्या टोळीचा सदस्य असल्याचं कबूल करून घेण्यात आल्याचं पोलीसांनी सांगीतलं आहे. दुसऱ्या एक व्हिडीयोमध्ये एका खांबाला बांधण्यात आलेला अवयव चोरणाऱ्या टोळीतल्या मुलाचा व्हिडीयो फेक असल्याचं समोर आलं आहे. व्हायरल करण्यासाठी असा व्हिडीयो बनवल्याप्रकरणी एका तरूणाला अटकही करण्यात आली आहे. मुलं चोरणाऱ्या एका महिलेचाही फोटो व्हायरल आहे, ती पोस्ट ही फेक असल्याचं आढळून आलं आहे.

बऱ्याचदा, चालू घडामोडींपासून लक्ष विचलित करण्यासाठी, लोकांना गुंतवून ठेवण्यासाठी फेक न्यूज किंवा अफवा पसरवल्या जातात. त्यामुळे अशा पद्धतीच्या पोस्ट आपल्या इनबॉक्स मध्ये आल्यास आधी खातरजमा करून घ्या. लगेच फॉरवर्ड करू नका. भीती पसरवू नका.

Updated : 25 Aug 2019 3:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top