दारूबंदी उठवण्याचा निर्णय धोक्याचा : डॉ अभय बंग

317

भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाने कोरोना प्रसार थांबविण्यासाठी अतिशय स्तुत्य पावले आतापर्यंत उचलली. पण रविवारी लॉकडाऊन चा दुसरा टप्पा संपता संपता देशातील रेड झोन मधील प्रतिबंधित क्षेत्र वगळता बाकी सर्वच ठिकाणी दारूबंदी उठवली. हा निर्णय अतर्क्य आणि तितकाच धोक्याचा असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी मॅक्स महाराष्ट्रला दिली आहे.

कोरोनामुळे आजच्या तारखेपर्यंत भारतात ४२ हजारावर लोकांना कोरोना आजाराचा संसर्ग झाला आहे. तर १३०० च्या वर मृत्यू झाले आहे. ही आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. पण त्याच वेळी भारतात दर वर्षी दारूमुळे पाच लक्षं मृत्यू होतात.

भारतातील ५ कोटी लोक दारूच्या व्यसनाने ग्रासित असल्याचे जागतिक आरोग्य संघटना संगत आहे. म्हणजे कोरोना संसर्ग आणि होणार्‍या मृत्यूपेक्षा दारूचे व्यसन आणि त्यामुळे भारतात होणारे मृत्यू हजार पटीने जास्त आहे. कोरोना फैलाव रोखण्यासाठी अनेक प्रकारची बंदी कायम ठेवताना शासनाने दारूच्या विक्रीला परवानगी दिली आहे. त्यामुळे शासनाने हत्ती सोडला आणि शेपूट धरून ठेवले आहे. त्यामुळेच हे अतर्क्य पाऊल असल्याचे डॉ. बंग म्हणाले.

हे ही वाचा…


Covid 19 चं उगमस्थान असलेल्या चीन ला भारत घाबरतोय का?

‘त्या’ व्हिडीओचा संबंध मशिदीशी जोडल्यामुळे अर्णब विरोधात गुन्हा दाखल

राहुल गांधी, राजन आणि धोका

कोरोनाशी लढा – केंद्राला जमले नाही ते आता काँग्रेस करणार !

दारूची दुकाने उघडल्याने तेथे गर्दी होणार आणि सुरक्षित अंतर पाळले जाणार नाही. ही शक्यता जास्त आहे. तिथे नियमही तोडले जातील. या गर्दीमधून पुरुष दारूच्या बाटलीवाटे घरी कोरोना घेऊन येतील. सोबतच घरपोच हिंसाही घेऊन येतील. त्यामुळे लोकांना घरपोच कोरोना पोहोचविण्याची योजना असावी. असे स्वरूप शासनाच्या या निर्णयामुळे निर्माण होईल असे डॉ. बंग म्हणाले.

कोरोना मुळे शासनाने महिनाभरापासून दारू, खर्रा व तंबाखूवर बंदी घातली होती. त्याचा हजारो पटीने फायदा या काळात झाला. ही बंदी कायम ठेवली असती तर लोकांचा आणखी फायदा झाला असता. पण दुर्दैव असे की दारुमुळे मार खाणारी जनता बोलत नाही. ती उलट दारूच्या दुकानसमोर रांग लावते. जनतेचे हीत आणि आरोग्य हा जर शासनाचा हेतू आहे. तर आशा निर्णयामुळे त्यावर पाणी फेरले जात असल्याचे डॉ. बंग म्हणाले. काम बंद, कमाई बंद पण दारू सुरू हे करण्यामागचे रहस्य काय? अशी शंकाही त्यांनी यावेळी उपस्थित केली आहे.