Home > मॅक्स व्हिडीओ > Video: ‘ही’ मुलाखत म्हणजे ‘नुरा कुस्ती’, मॅच फिक्सिंग; फडणवीसांचा पवारांना टोला

Video: ‘ही’ मुलाखत म्हणजे ‘नुरा कुस्ती’, मॅच फिक्सिंग; फडणवीसांचा पवारांना टोला

Video: ‘ही’ मुलाखत म्हणजे ‘नुरा कुस्ती’, मॅच फिक्सिंग; फडणवीसांचा पवारांना टोला
X

आज सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या शरद पवारांच्या मुलाखतीच दुसरा भाग प्रसारीत करण्यात आला. ‘एक शरद, सगळेच गारद!!’ या ठळक मथळ्याखाली घेतलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती.

त्याला आज फडणवीस यांनी उत्तर दिलं.

“स्वतःच मारून घ्यायचं आणि स्वतःच रडायचं ही एक नवीन पद्धत आहे. ती पद्धत जर अवलंबली तर आपल्या अपयशापासून लोकांची नजर बाजूला होते. त्यातलाच हा प्रकार आहे. कोणीही सरकार पाडत नाहीये. आपणच कांगावा करायचा, त्याच्यावर मुलाखती करायच्या, त्याच्यावरच बोलायचं, जेणेकरून करोनाचे प्रश्न दूर होतील, असा हा प्रयत्न आहे. मला वाटतं त्यांनी करोनाकडे लक्ष द्यायला हवं.” ही मुलाखत म्हणजे डब्ल्यूडब्ल्यूएफ किंवा नुरा कुस्ती आहे… मॅच फिक्सिंग आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.

Updated : 12 July 2020 1:40 PM GMT
Next Story
Share it
Top