Home > News Update > Corona Free Dharavi: श्रेय कोणाचं? RSS चं की सरकारचं?

Corona Free Dharavi: श्रेय कोणाचं? RSS चं की सरकारचं?

Corona Free Dharavi: श्रेय कोणाचं? RSS चं की सरकारचं?
X

मुंबईत कोरोनाला रोखताना आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी मधील कोरोना कसा रोखणार? असं आव्हान सरकार समोर होतं. मुंबईतील धारावीत कोरोनाला रोखण्यासाठी जे काही प्रयत्न केले जात आहेत. या संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानोम गेब्रेयेसुस यांनी ‘धारावी मॉडेल’ची स्तुती केली आहे.

सुरुवातीला धारावी मध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर धारावी मधील कोरोना कसा आटोक्यात आणायचा असा प्रश्न सरकार समोर होता. मात्र, या परिस्थितीत धारावीमधील कोरोना आटोक्यात आणल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने या मॉडेलची स्तुती केली आहे.

“मुंबईतील धारावी परिसरात कोरोना चाचणी, रुग्णांचा शोध घेणं, सोशल डिस्टन्सिंग आणि संसर्ग झालेल्या रुग्णांवर त्वरित उपचार केल्यामुळे करोनाविरोधातील लढाईत यश मिळताना दिसत आहे. काही देशांमध्ये आता निर्बंध कमी करण्यात येत आहेत. अशा ठिकाणी पुन्हा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. आम्हाला नेतृत्व, समाजाचा सहभाग आणि सामूहिक एकता आवश्यक आहे. एडहानोम गेब्रेयेसुस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान आरोग्य संघटनेच्या या ट्विट नंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये धारावीसारख्या परिसराला करोनामुक्त करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इतर समाजसेवी संस्था रात्रंदिवस कुठलाही गाजावाजा न करता काम करत होत्या. आता धारावी करोनामुक्त होण्याकडे वाटचाल करत असताना त्याचे संपूर्ण श्रेय राज्य सरकारला देणे हा संघासारख्या समाजसेवी संस्थांवर अन्याय आहे.

असं म्हणत संघाने धारावी मध्ये काम केल्याचा दावा केला आहे. धारावी कोरोना मुक्तीमध्ये आता राजकीय पक्षांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे.

नितेश राणे यांच्या ट्विट नंतर शिवसेनेने राणे बालिश बुद्धीने बोलत आहेत असा आरोप केला आहे. भाजपच्या आमदार मनीषा कायंदे यांनी हे लोकांचं सामुहिक काम आहे असं सांगितलं तर दुसरीकडे नितेश राणे यांचं हे मत भाजपचे मत नाही असा खुलासा भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी केला आहे.

शेतकरी कामगार पक्षाचे नेते राजू कोरडे यांनी नितेश राणे हे खोटे बोलत आहेत. असा आरोप केला आहे. मॅक्स महाराष्ट्र या कार्यक्रमात धारावी मुक्तीचा श्रेय कुणाचं? यावर सविस्तर चर्चा झाली… पाहा विशेष चर्चा

Updated : 12 July 2020 4:08 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top