मोदी सरकार खरंच गरिबांना मदत करणार का?: अतुल लोंढे

आज कोरोना व्हायरस च्या प्रादुर्भावाने देशाची आर्थिक गती मंदावली आहे. या संदर्भात कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी नोबेल पारितोषिक विजेते, अर्थतज्ञ अभिजीत बॅनर्जी यांच्याशी बातचित केली. देशाला या महामारी च्या संकटातून कसे बाहेर काढता येईल. या संदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली.

या चर्चेत अभिजीत बॅनर्जी यांनी देशाला मोठ्या आर्थिक पॅकेजची गरज असल्याचं सांगितलं. गरिबांना थेट मदत करायला हवी अशी सूचना देखील अभिजीत बॅनर्जी यांनी सरकारला केली आहे. मात्र, मोदी सरकार अभिजीत बॅनर्जी यांचा सल्ला ऐकणार का? कॉंग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांचा सरकारला सवाल