खडसेंची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न?
X
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनीच आपले तिकीट कापले असा आरोप करणाऱ्या एकनाथ खडसे यांनी आता यू टर्न घेत, आमच्यात सारं काही आलबेल आहे असं म्हंटलंय. जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसंदर्भात भाजपच्या बैठकीत गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे काल एकत्र होते.
या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ खडसे आणि गिरीश महाजनांनी सारं काही आलबेल असल्याचं सांगत पत्रकार परिषदच गुंडाळली. खडसे यांच्यासह काही ज्येष्ठ नेत्यांना तिकीट न देण्याचा निर्णय हा केंद्रीय स्तरावरुन झाला होता, त्याच्याशी आमचा संबंध नाही असाही दावा केलाय. पण २४ तास आधी थेट फडणवीस आणि महाजन यांच्यावर टीका करणाऱ्या खडसेंनी अचानक हा यू टर्न का घेतला अशीही चर्चा आता सुरू झालीये. दरम्यान धुळे आणि नंदुरबार जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी आज जळगावमध्ये एकनाथ खडसे यांची भेट घेतलीये. जैन हिल्सवर झालेल्या या बैठकीला गिरीश महाजनही उपस्थित होते.
हे ही वाचा
चहाच्या टपरीवर ७ रुपयाला कटिंग चहा आणि सीसीडी किंवा बॅरीस्टा मध्ये १०० रुपयांना का असतो ?
शहीद सावित्रीबाई : नेतृत्व, सेवाभाव आणि शौर्यगाथा – प्रा. हरी नरके
देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनीच आपलं तिकीट कापल्याच्या एकनाथ खडसे यांच्या आरोपानंतर पहिल्यांदाच या तिघांची भेट झाल्यानं खडसेंची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा आता सुरू झालीये.