Home > News Update > संरक्षण मंत्र्यांचे ‘ते’ कृत्य असंवैधानिक – अंधश्रद्धा निर्मुलन समिती

संरक्षण मंत्र्यांचे ‘ते’ कृत्य असंवैधानिक – अंधश्रद्धा निर्मुलन समिती

संरक्षण मंत्र्यांचे ‘ते’ कृत्य असंवैधानिक – अंधश्रद्धा निर्मुलन समिती
X

दसऱ्याच्या बहुचर्चित राफेल विमान भारताच्या ताब्यात मिळाले. त्या निमित्ताने संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या लढाऊ विमानाची पूजा केल्यानं काही संघटनांनी या कृतीचा निषेध केला आहे.

कोल्हापूरमध्ये अंधश्रद्धा निर्मुलन समितीने राजनाथ सिंह यांच्या या कृतीचा निषेध केला आहे. त्यांच्या मते ‘राजनाथ सिंह यांनी पुजा करून जगाला आपल्या अंधश्रद्धा मानसिकतेचे दर्शन घडवले आहे. भारतीय नागरिक म्हणून संरक्षण मंत्र्यांची ही कृती लज्जास्पद आहे.

त्यामुळे जगभरात भारताची बेअब्रू झालीच आहे. शिवाय आपल्या संविधानाने कलम 51 (ज) मध्ये सांगितलेल्या नागरिकांच्या कर्तव्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, शोधकबुद्धी आणि मानवतावाद यांचा विकास करणे ही कर्तव्य सांगितले आहे. आपल्या संरक्षण मंत्र्यांनी या कर्तव्याचे उल्लंघन केले आहे.

शिवाय संविधानाचा गाभा असलेल्या धर्मनिरपेक्षतेलाही धक्का पोहोचला आहे’.

असं अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतीनं प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी कोल्हापूर मध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह विविध संघटना एकत्र आल्या होत्या.

जन स्वास्थ्य दक्षता समिती, दलितमित्र बापूसाहेब पाटील वाचनालय, सर्व श्रमिक संघ, महिला दक्षता समिती, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, स्टूडंट फेडरेशन ऑफ इंडिया, ऑल इडिया स्टूडंट फेडरेशन या संस्थांनी संरक्षण मंत्री आणि सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. यावेळी सुधीर हांजे, राजवैभव शोभा रामचंद्र यांनी आपल्या भाषणातून राजनाथ सिंह यांच्या कृतीचा निषेध नोंदवला.

Updated : 9 Oct 2019 2:34 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top