भारतीय अर्थव्यवस्थेला शेतकरी तारणार का?

139

जागतिक अर्थव्यवस्था संकटात आहे. हे सांगण्यासाठी आता कोणी तज्ञाची गरज नाही. तशी भारतीय अर्थव्यवस्था संकटात असल्याचं सांगायला कोणत्या जागतिक अर्थतज्ज्ञाचीही गरज नाही. गेल्या 4 वर्षापासून भारतीय अर्थव्यवस्था वृद्धीचा दर ढासळत आहे.

आता कोरोनाच्या काळात तो अगदीच रसातळाला गेला आहे. अनेक अर्थतज्ज्ञांच्या मते भारतीय अर्थव्यवस्थेचा वद्धी दर उने 5 ते उने 12 पर्यंत जाण्याची जाऊ शकतो. अशा परिस्थितीत भारतीय अर्थव्यवस्थेला कोण तारणार? असा प्रश्न निर्माण होतो.

यंदा पाऊस मोठ्या प्रमाणात पडला आहे. त्यामुळं भारतीय अर्थव्यवस्थेचा मोठा हिस्सा असलेल्या शेतीचं उत्पन्न निश्चितच वाढण्याची शक्यता आहे. मात्र, उत्पन्न वाढलं तरी शेतमालाला भाव मिळणार का? असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळं भारतीय अर्थव्यवस्थेला शेतकरी तारण्याचा प्रयत्न निश्चितच करेल. मात्र, सरकारी स्थरावर त्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे.

म्हणजे देशात शेतीचं उत्पन्न वाढलं तरी शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळणं गरजेचं आहे. या संदर्भात कृषीअर्थतज्ज्ञ मिलिंद मुरुगकर यांचं विश्लेषण

Comments