Home > मॅक्स व्हिडीओ > अ‍ॅडसिड हल्ला आणि कायदा अ‍ॅड हेमा पिंपळे

अ‍ॅडसिड हल्ला आणि कायदा अ‍ॅड हेमा पिंपळे

अ‍ॅडसिड हल्ला आणि कायदा  अ‍ॅड  हेमा पिंपळे
X

कायदा होऊनही अ‍ॅडसिड हल्ले थांबले का? एखादा छप्पाक सारखा चित्रपट येतो. मात्र, लोकांची मानसिकता बदलते का? अ‍ॅडसिड हल्ला आणि कायदे... वाचा अ‍ॅड हेमा पिंपळे यांचं विश्लेषणउत्तरप्रदेश मधील गोंडा जिल्ह्यातील परसपुर पोलिस ठाणे हद्दीत एकाच कुटूंबातील तीन बहिणी वय १७,१२,८, भरझोपेत असतानाच अज्ञात इसमाने तिघीवरही अ‍ॅसिड हल्ला केला, हल्ल्यात मोठी मुलगी गंभीर जखमी झाली आहे. वडीलांच्या म्हणण्यानुसार त्यांचं कोणाशीही वैर नाही.

पेटो्ल हल्ला असो किंवा अ‍ॅसिड अथवा इतर आयुध वापरून हल्ला या हल्ल्याच्या शिकार स्ञी जातीच्या अधिक होतात. मला आठवतंय आपल्या देशात अ‍ॅसिड हल्ले नवीन नाहीत. ते सहज उपलब्धही होतं. परंतु लक्ष्मी अग्रवाल जी दिल्लीत राहणारी मध्यमवर्गीय पुढे तिचेवर छपाक पिक्चर ही आला. तिच्यावर नहीम खान जो तिचे मैञिणीचा भाऊ जो लग्न कर म्हणून लक्ष्मीचे मागे लागला. त्यानेच तिचा चेहरा विद्रुप करण्याचे ठरवले. अ‍ॅसिड हल्ल्याचा मुख्यतः उद्देशच चेहरा विद्रुप करणे हाच असतो. माझी नाही तर कुणाचीच नाही. ही विकृती त्यामागे.

लक्ष्मी अगोदर ही अ‍ॅसिड हल्ल्याच्या पीडीता आहेत. परंतु लक्ष्मीने जनहित याचिका दाखल केल्यामुळे कायद्यात महत्वाच्या दुरूस्त्या आणि अॅसिड विक्रीवर नियंञण आणण्यासाठी अ‍ॅसिड विकत घेताना ओळखपञ बंधनकारक केलं. ज्यामुळे अ‍ॅसिड खरेदी करणाराच्या नावाची नोंद होईल. तसेच केंद्रीय सरकारने अशा पिडीतांना विशेष प्रवर्गाचा दर्जा देऊन सरकारी नोकरीत आरक्षण.मनोधैर्य योजनेतुन आर्थिक मदत देऊ केली. इंडिया टुडेने सादर केलेल्या डेटा इंटेलिजेंस युनिट मधुन 2014 -2018 दरम्यान देशातएकुण 1483 महिंलावर अ‍ॅसिड हल्ला झाल्याचे स्पष्ट केले आहे.

या हल्ल्याला कायद्याचे भादविचे कलमानुसार संरक्षण आहेच. अ‍ॅसिड हल्ल्याचा प्रयत्न किंवा हल्ला यासाठी अ‍ॅसिड उपलब्ध करून देणे ही गुन्हा आहे. यासाठी अनुक्रमे 10 वर्षांचा तुरूंगवास व दहालाख रू दंडाची तरतूद व किमान पाच ते सात वर्षांची शिक्षा व दंडाची तरतूद आहे. कलम 324 व गंभीर हल्ला असेल तर 307 नुसार गुन्हा नोंदवला जातो. अ‍ॅसिड विकत घेणारा व देणाराही दोषी ठरतो. आपल्या देशात कायदे व शिक्षेच्या तरतुदी ही आहेत. तरीही असे गुन्हे होतात. आणि त्याला महिलाच बळी पडतात, हे दुर्देव आहे अ‍ॅसिड हल्ला आणि कायदा अ‍ॅड हेमा पिंपळे



Updated : 19 Oct 2020 8:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top