Home > News Update > कोरोनाशी लढणं शिकवणारा बालवक्ता!

कोरोनाशी लढणं शिकवणारा बालवक्ता!

कोरोनाशी लढणं शिकवणारा बालवक्ता!
X

“दिल बहलाने का सामान ना समझा जाए...अब मुझे आसान न समझा जाए”

या शायरीने तो आपल्या भाषणाची सुरूवात करतो आणि प्रेक्षकांच्या काळजाला थेट हात घालतो....मग पुढे आपल्या ओघवत्या वकृत्वशैलीत तो लॉकडाऊनमधली भीषण परिस्थिती मांडायला सुरूवात करतो आणि अंगावर शहारे येऊ लागतात....

सोशल मीडियावर सध्या एका 10 ते 11 वर्षांच्या मुलाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या मुलाचे नाव आहे कुशलकुमार नितीनकुमार माळी वाघळीकर....नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरमधल्या सार्वजनिक मराठी हायस्कूलमध्ये पाचवीत शिकणारा कुशल एक चांगला वक्ता म्हणून गाजतोय. कोरोनामुळे लॉकडाऊन लागू झाल्यानंतर कुशलच्या कुटुंबाने त्याचा दररोज एक व्हिडिओ तयार करण्याचा निर्धार केला. या काळात त्याचे जवळपास 100 व्हिडिओ त्यांनी तयार केलेत. यात कुशलने कोरोनावर आधारित पोवाडा आणि पथनाट्याचे सादरीकरण केले होते, तेही व्हायरल झाले होते.

या काळात कुशलने इतिहास, थोर समाजसुधारक, महाराष्ट्रातील थोर संत, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित, भूगोल, भारतातील विविध राज्य व त्यांच्या राजधान्या, विज्ञान, या सर्व विषयांचा अभ्यास करुन व्हिडिओ तयार केल्याचे त्याचे वडिल सांगतात. कुशलने आतापर्यंत अनेक वकृत्व स्पर्धांमध्ये पारितोषिकं मिळवली आहेत. कुशलचे वडील प्रा. डॉ. नितीनकुमार माळी वाघळीकर हे नवापूरच्या विनाअनुदानित शिक्षणशास्त्र महाविद्यालयात शिकवतात. नंदुरबारसारख्या आदिवासी जिल्ह्यातून या मुलाने आतापर्यंत अनेक ऑनलाईन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये पारितोषिकं मिळवली आहेत. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या कुशलला भविष्यात प्रगतीसाठी त्याला चांगले शिक्षण आणि प्रशिक्षण मिळवण्यासाठी आर्थिक मदत मिळाली तर बरे होईल असे त्याच्या कुटुंबियांना वाटते आहे.

Updated : 5 July 2020 3:26 AM GMT
Next Story
Share it
Top