सोशल मीडीयावर व्हायरल वालारी कौर

अमेरिकेतल्या सध्याच्या सामाजिक स्थितीवर वालारी कौर या भारतीय वंशाच्या फिल्म मेकर आणि वकील महिलेनं केलेलं हे भाषण सध्या सोशल मीडियावर चांगलच व्हायरल आहे. धर्मानं शीख असलेल्या या महिलेनं तिच्या भाषणाची सुरूवातच ‘वाहे गुरुजीदा खालसा, वाहे गुरूजी दी फतेय’ या घोषणेनं केली आहे. 103 वर्षांपूर्वी अमेरिकेत आलेल्या आपल्या अजोबांना कशा प्रकारे संशयीत म्हणून ताब्यात घेण्यात आलं होतं.  त्यांनी त्या काळी केलेला संघर्ष तिनं मांडून, अजूनही अमेरिकेतली परिस्थिती कशी कृष्णवर्णीय, शिख आणि मुस्लिमांबाबत तशीच आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. 11 सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर प्रत्येक गोरे व्यक्ती सोडून सर्व माणसांकडे गुन्हेगार, दहशतवादी, अनधिकृत घुसखोर किंवा संशयीत म्हणून पाहण्याच्या बळावलेल्या वृत्तीवर तिनं नेमकं बोट ठेवलंय. पेशानं वकील असलेल्या वालारीनं त्याविरोधात लढा उभारला आहे. गेली १५ वर्ष वेगवेगळे खटले आणि सिनेमांच्या माध्यमातून ती याविरोधात लढा देत आहे. तिच्या मुलासाठी आणि अमेरिकेच्या पुढच्या पिढीसाठी भविष्यात वाढून ठेवलेल्या काळ्या गर्द अंधाराची तिला भिती वाटतेय. तोच अंधार दूर करण्यासाठी लढा आणि साथ द्या अशी आर्जवं सुद्धा ती करत आहे.