Home > मॅक्स स्पोर्ट्स > मराठा समाजाला मिळाले आरक्षण, ATR च्या शिफारसी

मराठा समाजाला मिळाले आरक्षण, ATR च्या शिफारसी

मराठा समाजाला मिळाले आरक्षण, ATR च्या शिफारसी
X

महाराष्ट्रातील मराठा समाजाला आजचा दिवस आनंदाचा असून सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आज विधिमंडळाकडे लागलं असून (अॅक्शन टेकन रिपोर्ट - एटीआर) सादर करण्यात आला. त्याचबरोबर १५ पानी या अहवालात मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

मराठा आरक्षण विधेयकातील महत्त्वाच्या शिफारसी

- मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण

- अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था वगळून इतर शैक्षणिक संस्था आणि अनुदानित अथवा विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमधील एकूण जागांच्या १६ टक्के आरक्षण

- राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील आणि पदांवरील सरळसेवा प्रवेशाच्या एकूण नियुक्त्यांच्या १६ टक्के

- ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही धक्का नाही

महाराष्ट्रात सध्याची आरक्षणाची स्थिती

अनुसूचित जमाती (ST) - ७ टक्के

अनुसूचित जाती (SC) - १३ टक्के

ओबीसी - १९ टक्के

भटक्या जमाती (NT) - ११ टक्के

विशेष मागास वर्ग (SBC) - २ टक्के

Updated : 29 Nov 2018 9:38 AM GMT
Next Story
Share it
Top