Home > मॅक्स स्पोर्ट्स > Asia cup: आशिया कपवर भारताचे नाव कोरले

Asia cup: आशिया कपवर भारताचे नाव कोरले

Asia cup: आशिया कपवर भारताचे नाव कोरले
X

भारताने बांगलादेशवर ३ गडी राखत विजय मिळवला आणि या सामन्यात अखेरच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावणारी चुरश पाहण्यास मिळाली. भारताने सातव्यांदा हा चषक जिंकला आहे. अखेरच्या चेंडूपर्यंत सामना खेळला गेला, सामना भारत जिंकणार, बांगलादेश जिंकणार की सुपरओव्हर अशी शक्यता प्रेषक राखत होते.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा डाव २२२ धावांत रोखण्यात भारताला यश आले. बांगलादेशच्या २२२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक यांनी चांगली फलंदाजी केली. अखेरीस खालच्या फळीतील ( टेल एन्डर्स ) खेळाडूंनी किल्ला लढवत आशिया कपवर विजय मिळवला.

Updated : 29 Sep 2018 8:13 AM GMT
Next Story
Share it
Top