वेलकम फिफा

वेलकम फिफा
X

फिफा अंडर 17 फुटबॉल विश्वकप प्रथमच भारतात आयोजित करण्यात आली आहे. याच दरम्यान आज मुंबईत गेट वे ऑफ़ इंडिया ठिकाणी फिफा अंडर 17 फुटबॉल विश्वकपच्या चैंप्पिंग ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले होते. आजच्या सोशल जाळ्यात अडकत चाललेल्या बाल-तरुण मुलांना पूर्वपदावर आणण्याचा स्तुत्य उपक्रम महाराष्ट्र फुटबॉल असोसिएेशनतर्फे करण्यात आलेल्याचे श्री शिवाजी पाटील(फुटबॉल कोच) यांनी मॅक्स महाराष्ट्राशी बोलताना सांगितले.

फिफा अंडर 17 विश्वकप चँपिंग ट्रॉफीच्या अनावरणाला युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे तसेच महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची उपस्थिती होती. फिफा अंडर 17 विश्वकपच्या खेळाचा मध्यांतर नवी मुंबई येथील डि. वाय. पाटील स्टेडियमला होणार असून फाइनल कोलकाताला होणारेय.

संपूर्ण विश्वभरातून फुटबॉलचे चाहते भारतात दाखल झाले असून भारताच्या तरुण पिढीचे ही लक्ष फिफा अंडर 17 विश्वकप कडे लागली आहे. अर्थात आज प्रदर्शनाला ठेवण्यात आलेली ट्रॉफी कोणती फुटबॉल टीम जिंकणार आहे हे पाहणे उस्तुकतेची ठरणार आहे.

Updated : 10 Sep 2017 3:55 PM GMT
Next Story
Share it
Top